ग्रामीण रुग्णालयास राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नामकरण करणेबाबतचा विशेष बाब म्हणुन प्रस्ताव -- राजेंद्र श्रीकांत चौधरी मा. नगराध्यक्ष : नगरपरिषद, सावदा तथा जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, जळगांव जिल्हा
सावदा येथील न.पा. कडील दवाखाना शासनाच्या धोरणानुसार बंद करण्यात आलेला होता. त्यानुसार सावदा शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय बांधण्यात यावे अशी मागणी शासनाकडेस करण्यात आलेली होती. त्यावेळेस नगरपरिषदेमार्फत विशेष सभा ठराव क्र. ३४ दि. ३१/०७/२०१० अन्वये नगरपालिका मालकीची ग.नं. १४७०, १४७२ व १४७३ मधील जागा शासनाकडेस ग्रामीण रुग्णालय बांधणेसाठी हस्तांतरीत करण्यात आलेली होती. सदर ठरावाच्या वेळेस या ठिकाणी रुग्णालयाचे बांधकाम पुर्ण झालेनंतर त्यावेळेस प्रस्तावित असलेले नांव राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे कायम ठेवण्यात यावे असे ठरविण्यात आलेले होते. तथापि सदर रुग्णालयाचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर सदर नांव त्याठिकाणी देण्यात आलेले नव्हते.
याबाबत वेळोवेळी जिल्हा शल्य चिकीत्सक, जळगांव यांचेकडेस पाठपुरावा करण्यात आलेला होता. मात्र संबंधितांमार्फत आरोग्य विभागाकडील सन २०१२ च्या शासन निर्णयानुसार सदर ग्रामीण रुग्णालयास महापुरुषांचे नांव देता येणार नाही असे कळविण्यात आलेले होते. तथापि सदर रुग्णालयांस नांव देणेबाबत सावदा शहरातील समस्त शिवप्रेमी यांचेमार्फत दि. १९/५/२०२५ रोजी ग्रामीण रुग्णालयास राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नांव देणेबाबत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलेले होते.
सदर उपोषणांस मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघ आ. चंद्रकांत निंबा पाटील, व रावेर विधानसभा मतदार संघ आ. अमोल हरिभाऊ जावळे, यांनी व इतर मान्यवरांनी भेट दिल्यानंतर त्याठिकाणी झालेल्या चर्चेनुसार सदर रुग्णालयांस हे नांव सन १९९९ पासुन देण्यात आलेले असुन ही मागणी सदर जागा हस्तांतरीत करण्याच्या वेळेपासुन म्हणजेच सन २०१० पासुनची असुन लोकभावना लक्षात घेता विशेष बाब म्हणुन त्याविषयाचा नविन प्रस्ताव आपणांकडेस सादर करावा असे ठरले.
यावेळेस दोन्ही आमदार व राजेंद्र चौधरी यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक, जळगाव यांचेसोबत दुरुध्वनीद्वारे चर्चा सुध्दा करण्यात आलेली होती. सदर ग्रामीण रुग्णालयास राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असे नांव देणेबाबत विशेष बाब म्हणुन प्रस्ताव शासनाकडेस पाठविण्यात यावा. सदर प्रस्तावास सावदा शहरातील तमाम शिवप्रेमी व नागरिकांची लोकभावना लक्षात घेता सदर नामकरण प्रस्तावास विशेष बाब म्हणुन मान्यता देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
















إرسال تعليق