प्रतिनिधी : राहुल चौधरी | प्रदीप कुळकर्णी
शिंगाडी ता. रावेर या गावातील गेल्या २५ वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा यासाठी २५ एप्रिल आणि पुन्हा ५ मे रोजी फैजपूर येथील प्रांत कार्यालयासमोर पंचशील नगर मधील संपूर्ण ग्रामस्थांकडून बेमुदत आमरण उपोषण झाले. हा प्रश्न सोडवण्यासाठी १५ मे रोजी आढावा बैठक होणार आहे.
पंचशील नगरमधील ग्रामस्थांनी उपोषण करताना पुनर्वसनाच्या प्रकरणा संदर्भात संपूर्ण लेखी आराखडा तयार करून द्यावा, अशी मागणी केली. त्यानुसार रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी तसे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर संबंधित ग्रामस्थांनी उपोषणाला स्थगिती दिली. प्रसंगी ग्रामस्थ बुद्धभूषण बगाडे, प्रमोद बगाडे, मनोज बगाडे, सुपडू बगाडे, आशुतोष तायडे, फुलसिंग कोजगे, संदीप कोजगे, शिंगाडीचे सरपंच दीपक सोनवणे, योगिता बगाडे, सुमित्राबाई बगाडे, कल्पना बगाडे, अनिता कोसगे, ताराबाई बगाडे , रेखाबाई कोजगे ,सुशिलाबाई बगाडे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, व इतर उपोषणकर्ते उपस्थित होते.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |


















Post a Comment