प्रतिनिधी : राहुल चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथील गौसिया नगर, मदीना नगर, जिलानी नगर, मोहम्मदिया नगर या भागातील नागरिकांना विजेच्या दाबाची समस्या गेल्या वर्षापासून जाणवत होती या भागात एक नवीन 'विद्युत वितरण रोहित्रा' ची गरज होती कि, ज्यामुळे या भागातील नागरिकांची विजेच्या दाबाची समस्या सुटणार होती.
गेल्या एप्रिल महिन्याच्या शेवटी म्हणजे जवळ पास दि. २८ एप्रिल रोजी सावदा येथील वरील नामनिर्देशित भागातील नागरिकांनी माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली सावदा येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात मोर्चा नेवून कार्यकारी अभियंता यांच्याशी या भागातील लोकांच्या समस्येवर सविस्तर चर्चा केल्यानंतर लगेच मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केल्यानंतर आमदारांनी या भागातील रहिवाशांची समस्यांची जाण ठेवून लगेचच सावदा येथील कार्यकारी अभियंता गणेश महाजन यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा करून या भागात मजूर १०० KVA चे 'विद्युत वितरण रोहित्र' ज्याला काही तांत्रिक अडचणी मुळे अजून काही कालावधी लागणार असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून एक तात्पुरत्या स्वरुपात २०० KVA चे विद्युत रोहित्र बसवण्याचे आदेश देवून तत्काळ बसवण्यात सुद्धा आले.
या केलेल्या तप्तर कामासाठी येथील नागरिकांनी आमदार चंद्रकांत पाटील तसेच माजी नगरसेवक फिरोज खान पठाण त्याच प्रमाणे सावदा येथील महावितरण चे कार्यकारी अभियंता गणेश महाजन, कार्यकारी अभियंता उपअभियंता दिलीप कोल्हे, तसेच सहायक अभियंता हेमंत चौधरी यांचे आभार मानले.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |

















Post a Comment