प्रतिनिधी : प्रदीप कुळकर्णी | राज चौधरी
16 जून शाळा सुरु होण्याचा दिवस... दोन महिन्याची प्रदीर्घ सुटी संपवून शाळा सुरु झाल्या. घरी राहून कंटाळलेले शाळेत जाण्यास उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत पहिल्याच दिवशी बँड बाज्याच्या गजरात जोरदार प्रवेश सोहळा पार पडला.
शासकीय आदेशानुसार शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंद वाटेल असे पोषक वातावरण निर्माण करण्यात सावदा येथील पी एम श्री श्री नाना साहेब विष्णू हरी पाटील विद्यालयाला यश मिळाले. त्यामुळे यंदा शाळेतील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. शाळेत मागील काही वर्षांपासून नगर पालिकेने केलेले विकास काम आणि पी एम श्री योजने मुळे शाळेला यंदा खूप फायदा झाल्याचे मनोगत मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे यांनी केले.
सुरुवातीला सावदा नगरपालिका मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या हस्ते प्रत्येक नवीन विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प देऊन आणि मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे यांच्या हस्ते औक्षण करून ढोल ताश्यांच्या गजरात विद्यार्थिनींना शाळेत प्रवेश दिला गेला. त्यानंतर पाचवीच्या प्रत्येक विद्यार्थिनीस शालेय साहित्य, शालेय पोशाख, वह्या पुस्तके आदी वस्तूंचे वाटप मुख्याधिकारी भूषण वर्मा, न. प.कार्यालय अधीक्षक प्रमोद चौधरी यांचे हस्ते करण्यात आले. तसेच इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्रथम येणारी खुशी सैतवाल, द्वितीय येणारी वैदेही भंगाळे, तृतीय आलेली रेश्मा चौधरी यांचा सत्कार मुख्याधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वर्मा यांनी शाळेत प्रवेशात्सवामुळे मुलींमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे त्याचा फायदा शाळेची गुणवत्ता आणि विद्यार्थिनीची उपस्थिती वाढविण्यासाठी केला जावा असे आवाहन मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी केले.यावेळी खुशी सैतवाल हिचे पालक डॉ दिपक सैतवाल यांनी शाळेला गरीब होतकरू विद्यार्थिनी शालेय साहित्य घेण्यासाठी अकराशे रुपये शाळेला भेट दिले.
यावेळी मुख्याधिकारी भूषण वर्मा, कार्यालय अधीक्षक प्रमोद चौधरी, पालक शिक्षक संघ उपाध्यक्षा स्मिता राणे, सतीश पाटील, पालक किरण भोई, मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे यांचे सह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.
- या बातमीचे प्रायोजक आहे -
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |










إرسال تعليق