Khandesh Darpan 24x7

सावदा येथे तेजज्ञान फाउंडेशन तर्फे पारिवारिक शिबिराचे आयोजन




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


तेजज्ञान फाउंडेशनच्या सरश्री यांच्या मार्गदर्शनाखाली "हॅपी थॉट्स" तर्फे सावदा येथील गांधी चौक भागातील दत्त मंदिर महानुभाव मोठा मठ येथे २६ जुलै सकाळी १०:३० ते दुपारी ३:३० या दरम्यान "रिश्तो मे नई रोशनी" या शीर्षका अंतर्गत एक विशेष पारिवारिक शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 



या शिबिरात, कुटुंबात प्रेम आणि शांतीचे बंधन कसे मजबूत करावे, नात्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे रहस्य, नात्यांमध्ये परिपूर्णता कशी आणायची?, कुटुंबात सुसंवाद कसा राखायचा?, या आणि आणखीन काही पारिवारिक तथा कौटुंबिक बाबींवर दृष्टिक्षेप टाकला जाणार आहे. 





हे शिबिर विनामूल्य असून हे शिबिर पती-पत्नी, युवक, पालक या सर्व वर्गातील नागरिकांसाठी खुले आहे. नात्यात सुसंवाद निर्माण करून आदर्श कुटुंब घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या अनोख्या शिबिराचा आवर्जून लाभ घ्यावा, असे तेजज्ञान फाउंडेशन च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post