Khandesh Darpan 24x7

वरद बढे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग मधील गाठली एमटेक हि पदवी



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



वरद राजेश बढे यांनी आयआयआयटी बंगळुरू येथून आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगमध्ये असलेले संगणक विज्ञान विषयात एमटेक यशस्वीरित्या पूर्ण केले.



वरद बढे हे मूळ गाव न्हावी ता. यावल चे रहिवासी पण सध्या फरीदाबाद (दिल्ली) येथे कायमचे वास्तव्याला असलेले आणि सावदा ता. रावेर येथील माजी नगराध्यक्ष कै. बाळासाहेब रविंद्र विष्णूहरी पाटील यांची सुकन्या रोहिणी बढे (पाटील) यांचे सुपुत्र आहेत.



वरद बढे यांचे वडील राजेश मुरलीधर बढे (मुळगाव न्हावी ता. यावल) हे फरीदाबाद (दिल्ली) येथे इंडिअन ऑईल च्या संशोधन आणि विकास (रिसर्च आणि डेव्हलेपमेंट सेंटर) केंद्रात मुख्य महाव्यवस्थापक (चीफ जनरल मॅनेजर) म्हणून कार्यरत आहेत तर आई सौ. रोहिणी बढे (सावदा ता. रावेर येथील माजी नगराध्यक्ष कै. बाळासाहेब रविंद्र विष्णूहरी पाटील यांच्या सुकन्या) ह्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.





वरद बालपणापासूनच अभ्यासात हुशार आणि मेहनती तथा हुन्नरी. इयत्ता १२ वी मध्ये त्यांना दिल्ली पब्लिक स्कूल सोसायटी तर्फे चेअरमन्स गोल्ड मेडल मिळाले होते, जे एका बॅच मधील फक्त ४ विद्यार्थ्यांनाच मिळते. वरद यांचे उच्च माध्यमिक शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल फरीदाबादला झाले.



वरद बढे यांनी आयआयआयटी बंगळुरू येथून आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगमध्ये तज्ज्ञ असलेले संगणक विज्ञान विषयात एम. टेक. यशस्वीरित्या पूर्ण केले. हा अभ्यासक्रम पाच वर्षाचा इंटिग्रेटेड एम. टेक. होता. त्यांना बी. टेक. कॉम्प्युटर सायन्स व एम. टेक. कॉम्प्युटर सायन्स विथ स्पेशलायझेशन इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मध्ये डिग्री मिळाली असून सध्या ते तायवान च्या मेडियाटेक कंपनीमध्ये सिनियर इंजिनियर म्हणून नुकतेच कार्यरत झालेत. 



त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल समाजातील सर्व थरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीच्या शुभेच्छ्या दिल्या जात आहेत.




या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post