आपल्या परखड आणि स्पष्ट मतांसाठी ओळखले जाणारे अभिनेते शरद पोंक्षेंनी अगदी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं आहे.
मध्ये वाचा : द्वितीय पुण्यस्मरण : स्व. बाळासाहेब रवींद्र विष्णू पाटील
खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
राज्यात मागील काही दिवसांपासून मराठी विरुद्ध हिंदी असा वाद रंगल्याचं चित्र दिसत आहे. उत्तरेकडील राज्यांमधूनही यासंदर्भात वेगवेगळी विधानं केली जात आहेत. महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यासंदर्भातील विषयावरुन पुढे आलेल्या या वादामधून आता लढाई मोर्चांच्या माध्यमातून थेट रस्त्यापर्यंत आली आहे. असं असतानाच मनोरंजन, कला आणि सामाजिक क्षेत्रातूनही मराठीच्या मागणीसाठी पाठिंबा मिळताना दिसतोय. ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनीही एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मुंबईतील मराठी शाळा, शिक्षक यांच्या अवस्थेवर भाष्य केलं आहे. मुंबईतील अमराठी बिल्डर लॉबीबद्दलही पोंक्षे रोखठोकपणे बोलले.
मराठी माणसं का गायब झाली?
पोक्षेंनी ठाकरेंचा, मराठी माणसांचा बालेकिल्ला असलेल्या भागांमधून मराठी माणसं गायब कशी झाली?.. असा सवाल उपस्थित केला आहे. "मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पक्षाच्या हातातच या मुंबईच्या महानगरपालिकेची सत्ता होती. मग महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत जे अमराठी लोक घुसले आहेत आणि जे जे मुख्य मराठी माणसांचे बालेकिल्ले होते, जिथे आमच्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी भायखळा, लालबाग, परळ, दादर, माहीम, गिरगाव हे मराठी माणसांचे परिसरात शिवसेना रुजवली, त्या सगळ्या ठिकाणाहून मराठी माणसं गायब कसे झाले?" असा सवाल पोंक्षेंनी विचारलाय.
बिल्डर लॉबीचं कनेक्शन
मराठी माणसं मुंबईमधून गायब होण्यासाठी अमराठी बिल्डर लॉबी कारणीभूत असल्याचं मत पोंक्षेंनी या प्रश्नाचं उत्तर शोधताना सापडतं असं म्हटलंय. "बिल्डरांची जी लॉबी मुंबईत आली, त्यात 90 टक्के अमराठी बिल्डर्स घुसले. या बिल्डर्सना ज्या परवानग्या दिल्या गेल्या आणि तेव्हा महापलिकेवर ज्यांची सत्ता होती, त्यांनी यांना अशी अट का घातली नाही, की तुम्ही एखादी चाळ पाडून टॉवर बांधणार असाल, तर त्यात मराठी कुटुंबांना सगळे फ्लॅट दिलेच पाहिजेत. किंवा फक्त मराठी बिल्डर्सनाच आम्ही पुनर्बांधणीसाठी देऊ, असा नियम का लावला नाही? तेव्हा सगळे एकत्र रस्त्यावर का नाही उतरले?" असा थेट सवाल पोंक्षेंनी उपस्थित केलाय.
शाळांसाठी रस्त्यावर का उतरले नाही?
"महाराष्ट्रातील, मुंबईतील सगळ्या मराठी शाळा प्रचंड वेगाने कमी होत गेल्या. त्याचवेळी इंग्रजी शाळांचं एक जंगल उभं राहिलं. डोळ्यांसमोर मराठी शाळांची संख्या कमी झाल्या, त्यात शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली. आमचा एसएससी बोर्ड संपला आणि तिथे सीबीएससी बोर्ड निर्माण झाला. याबद्दल कधी कोणते नेते रस्त्यावर का नाही उतरले? शाळा संपली, मराठी भाषा संपायला निघाली. मराठी शाळांमधील दुरवस्था, शिक्षकांची दुरवस्था, अशी व्यवस्था का झाली?" असा प्रश्नही आपल्याला पडतो असं पोंक्षे म्हणाले.
या बातमीचे प्रायोजक आहे.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
सौजन्य : झी २४ तास
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.


















Post a Comment