Khandesh Darpan 24x7

डॉ. हाजी हारून शेठ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात पक्ष प्रवेश निश्चित



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात राज्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. 



या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तथा पक्ष वाढीसाठी नवीन कार्यकरणी निर्माण करणे तसेच नवीन उमेदवारांना पक्ष प्रवेश देणे अश्या कामाला सर्वच पक्ष श्रेष्ठींकडून वेग आला आहे. अश्यातच या निवडणुकीपूर्वी सावदा शहरात राजकीय वर्तुळात शहर व परिसरातील थोर समाजसेवक तथा प्रख्यात उद्योगपती तसेच शिक्षण क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक कमावलेले नामांकित व्यक्तिमत्व-शिक्षण सम्राट डॉ. हाजी हारून शेठ त्यांचे अनेक समर्थकांसह येत्या दि. १७ ऑगस्ट रोजी जळगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजित दौऱ्या प्रसंगी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. 







या प्रवेशामुळे सावदा नगरपालिका आगामी निवडणुकीच्या राजकारणात कमालीचा मोठा बदल होण्याची शक्यता या प्रवेश सोहळ्याला घेऊन राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते, हा प्रवेश झाल्यास सावदा शहराच्या पालिकेमध्ये सत्तांतरात मोठी उलाढाल होऊ शकते. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासह समाजसेवेत सतत अग्रेसर असलेल्या या व्यक्तिमत्वाचा पक्षप्रवेश हा स्थानिक पातळीवर सत्तासमीकरण बदलणारा ठरू शकतो. 



सध्या सावद्यात अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाच्या हातात असून, अशा घडामोड्या येत्या काळात सुद्धा पाहण्यास मिळतील. तरी सदरच्या प्रवेश सोहळ्याची किमियागरी यांचीच एक झलक आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post