Khandesh Darpan 24x7

मूर्ती प्रतिष्ठापना, सुगंगा नगर मधील गजानन नगरात श्री नर्मदेश्वर महादेव, श्री गणेश, श्री हनुमान मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  राहुल  चौधरी



सावदा येथे श्री नर्मदेश्वर महादेव, श्री गणेश, श्री हनुमान मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी फुलांची आरास तथा विद्युत रोषणाई ने व रांगोळीने मंदिर सजवण्यात आले. सायंकाळी १००८ दीप प्रज्वलित करण्यात आले. मंत्रोच्चाराने मंदिराचा परिसर दणाणून गेला. 



सुगंगा नगर तथा गजानन नगरातील तसेच सावदा शहरातील नागरिकांच्या पुढाकारातून उभारलेल्या श्री रामदूत हनुमान तथा श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दोन दिवसीय मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा कुंभारखेडा येथील पुरोहित आचार्य यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर येथील पुरोहित समाधान जोशी, हिमांशू जोशी, किरण जोशी, अनिकेत जोशी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला




दि. १० रोजी संध्याकाळी शहरातील सुगंगा नगर, गजानन नगर परिसरात कुंभ कलश, मूर्तीची सवाद्य पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत परिसरातील नागरिकांनी विशेषतः महिलांनी पारंपारिक वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून पारंपारिक नृत्य सादर केले. मिरवणुकीला गांधी चौक सावदा येथील शिवाजी चौधरी यांच्या विठ्ठल भजनी मंडळ यांनी सादर केलेल्या ओव्यांनी अधिक रंगत आली. 


व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा  


दि. ११ आणि दि. १२ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ४ पर्यंत महारुद्राभिषेक यात प्राणप्रतिष्ठा पूजा, श्री गणपती, श्री बजरंग बली, श्री महादेव, नंदी यांच्या नुतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा, गणपती अथर्वशीर्ष, पुरुसुक्त अश्या प्रकारच्या महापूजा त्याच प्रमाणे होमहवन विधीच्या मंत्रोच्चाराने परिसर दणाणून गेला. 


व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 


व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 


या मूर्ती प्रतिष्ठापनेत सचिन महाजन, कैलास पाटील, हरिष माळी, हर्षल चौधरी, योगेश वाडे, भरत पाटील, तुषार राणे, धनराज बारी, मयूर महाले या दाम्पत्यांनी सहभाग नोंदविला. दि. ११ च्या रात्री आठ ते दहा या-वेळेत सावदा आणि कोचुर येथील राजपूत महिला मंडळ यांची प्रवचन आणि जागरण सेवा पार पडली. दि. १२ रोजी दुपारी मूर्ती प्रतिष्ठापनेत सहभागी दाम्पत्यांच्या हस्ते श्री नर्मदेश्वर महादेव, श्री गणेश, श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली. मंदिरावर कळस रोवण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजेला महाआरती संपन्न झाल्यावर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 


अश्या प्रकारे मोठ्या जल्लोषात हा धार्मिक मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम निर्विघ्न पार पाडण्यासाठी सुगंगा नगर, गजानन नगर तथा सावदा शहरातील नागरिकांनी अमूल्य असे सहकार्य केले.



या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post