Khandesh Darpan 24x7

सावदा येथील पाच भाविक पवित्र उमराहसाठी मक्का-मदिना येथे रवाना: स्थानिकांकडून सत्कार



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



सावदा शहरातून पाच भाविक पवित्र उमराह यात्रेसाठी मक्का-मदिना येथे रवाना झाले आहेत. यानिमित्ताने स्थानिक नागरिकांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. उमराहसाठी रवाना होणाऱ्यांमध्ये अकरम खान, अमानुउल्ला खान आणि त्यांच्या पत्नी साजेदा बी अकरम खान तसेच शेख शरीफ शेख कमरोद्दीन आणि त्यांच्या पत्नी ताहेरा बी शेख शरीफ, नथ्थू शाह महमूद शाह यांचा समावेश आहे.



सावदा येथे दिनांक २३ ऑगस्ट रोजी सय्यद अब्दुल कादीर जिलानी हॉल रजा नगर मध्ये आयोजित कार्यक्रमात उमराहसाठी जाणारे भाविक अकरम खान अमानुउल्ला खान यांचे पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भानुदास भारंबे, शेख फरीद, कैलास लवंगडे, अजहर खान, दीपक श्रावगे, शेख मुखतार, अनमोलदर्शी तायडे, राजेश चौधरी, शेख साजिद, राजू पाटील आणि फैजपूर येथील शेख फारुख पत्रकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांना पवित्र यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.


उमराह, ज्याला इस्लाम धर्मात ‘छोटा हज’ असेही संबोधले जाते, ही मक्का येथे केली जाणारी एक महत्त्वपूर्ण धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या सुन्नतनुसार केली जाते. उमराहमध्ये विशेष धार्मिक विधींचा समावेश आहे, ज्यामध्ये अहेराम (विशेष कपडे) परिधान करणे, काबा शरीफची सात वेळा परिक्रमा (तवाफ) करणे, नमाज अदा करणे‘ लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक’ ही प्रार्थना म्हणणे, सफा आणि मरवा या दोन टेकड्यांदरम्यान सात वेळा धावणे आणि केस कापणे यांचा समावेश आहे. या सर्व विधींमुळे उमराहला इस्लाममध्ये विशेष स्थान आहे.


या प्रसंगी अल्हाज गुलाम गौस खान बलदार खान, अल्हाज अकबर खान अमानुउल्ला खान, अजमल खान बलदार खान आणि असगर खान अमानुउल्ला खान यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. सावदा शहरातील नागरिकांनी या भाविकांना त्यांच्या पवित्र यात्रेसाठी शुभकामना दिल्या.



या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

أحدث أقدم