प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
येथील धनाजी नाना महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांना सन २०२३-२४ मध्ये क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विद्यापीठ इतिहासातील पहिलाच 'उत्कृष्ट शारीरिक शिक्षण संचालक पुरस्कार' जाहीर होवून प्रदान करण्यात आला.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. कुलकर्णी व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. गोविंद मारतळे व त्यांच्या सौभाग्यवती सुशीला मारतळे यांना दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी विद्यापीठात सन्मानपूर्वक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रा. गोविंद मारतळे यांच्या अथक प्रयत्नामुळे महाविद्यालयीन व विद्यापीठ क्षेत्रातील खेळाडूंनी विविध खेळामध्ये उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाचे, विद्यापीठाचे नावलौकिक देशभरात निर्माण केले आहे. प्रा. गोविंद मारतळे यांना मिळालेल्या पुरस्कारांमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मधुस्नेह परिवाराचे कुटुंब प्रमुख व तापी परिसर विद्या मंडळ संस्थेचे अध्यक्ष शिरीष मधुकरराव चौधरी, उपाध्यक्ष- डाॅ. एस. के. चौधरी, सदस्य- मा. प्राचार्य डाॅ. एस. एस. पाटील, संजय चौधरी व संपूर्ण संचालक मंडळातील सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आर. बी. वाघुळद, सर्व शिक्षक, मित्रपरिवार, शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग व सदैव मित्रा प्रमाणे राहणारे सर्व खेळाडू यांनी प्रा. गोविंद सदाशिवराव मारतळे यांचे अभिनंदन केले.
प्रा. गोविंद मारतळे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी विद्यापीठाचे सन्मानीय कुलगुरु व प्रशासनासह तापी परिसर विद्यामंडळाचे अध्यक्ष व संपुर्ण संचालक मंडळाचे आणि सहकारी प्राध्यापक व प्राध्यापिकेतर कर्मचारी, मित्र, परिवारातील सदस्य यांचे आभार व्यक्त केले.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.



















إرسال تعليق