प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. उल्हास पाटील यांच्या मातोश्री श्रीमती गोदावरी वासुदेव पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी आज ३ सप्टेंबर रोजी दुपारी १.३४ वा. वृद्धापकाळामुळे निधन झाले.
अंत्ययात्रा उद्या ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरातून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात मुलगी, जावाई, दोन मुले, सुना, नातवंडे, पणती असा परिवार आहे.
त्या माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सुभाष पाटील, प्रमिला भारंबे यांच्या मातोश्री होत. तसेच भाजपच्या डॉ. केतकी पाटील यांच्या आजी होत.
श्रीमती गोदावरी पाटील या गोदावरी परिवाराच्या आधारवड होत्या. त्यांच्या जाण्याने गोदावरी परिवार पोरका झाला.
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
ओम शांती









إرسال تعليق