निभोरा पोलिस स्टेशन चे सपोनि हरिदास बोचरेंची कामगिरी
प्रतिनिधी | ऐनपुर
ऐनपूर ता. रावेर गेल्या काही दिवसापासून निंभोरा, सावदा, यावल, रावेर, मुक्ताईनगर या परिसरातील शेतकरी यांचे शेती उपयोगी साहित्य तसेच तोलकाटा वरील बॅटरी इन्व्हेटर व मोटार सायकल चोरीस जाण्याच्या घटना घडत होत्या, परतु याचा तपास लागत नव्हता मात्र निभोरा पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी हरिदास बोचरे यांना वरिष्ठानी दिलेल्या मार्गदर्शनाने तांबे या सहकारी पोलीस शिपाई मार्फत गेल्या १५ दिवसा पासून या परिसरात साकळी पद्धतीने नाकांबदी व रात्री गस्त करून तांत्रीक व आधुनिक पद्धतीने तपास करून व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून साधारण १२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.
दि ११ सप्टेबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता संशयीत विलास ऊर्फ काल्या सुपडू वाघोदे रा. वडगाव याला पोलिसाची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढला त्याच्या राहत्या घरात त्याच्या सोबत असलेली महिला योगिता सुनिल कोळी हि मिळून आली. त्या घरात तपास केला असता त्यात मोटर सायकल, लहान सोलर प्लेट, नळ्या इतर साहित्य मिळून आले. याबाबत चौकशी केली असता बाकीचे साहित्य विलास ऊर्फ काल्या वाघोदे याचा शिरसाळा येथिल साथीदाराच्या मदतीने चोरी करून वडगांव येथिल जमील तडवी याच्या मदतीने निभोरा येथिल स्वप्नील चौधरी यास विकत असल्याची कबुली दिल्याने सपोनि हरिदास बोचरे यांनी निभोरा पोलिसांच्या मदतीने चोरीचा माल घेणारा मुख्य सुत्रधार स्वप्नील वासुदेव चौधरी यास ताब्यात घेवून त्याला विचारपूस केल्यावर त्याचे घर, गोडावून मधून चोरी केलेल्या बॅटऱ्या, इन्व्हटर मशिन व शेती साहित्य मिळून आले.
या प्रकरणी चोरी करणारा मुख्य सूत्रधार वडगांव ता. रावेर येथील विलास उर्फ काल्या सुपडू वाघोदे हा फरार असून त्याचे सहकारी तपत कठोरा ह.मु. वडगांव येथील योगीता सुनिल कोळी, शिरसाळा ता. बोदवड येथील गोपाळ संजय भोलनकर, आकाश मधूकर घोटकर, अर्जून रतनसिंग सोळकी हे आहेत.
या आरोपी कडून चोरी केलेला माल ताब्यात ठेवून विल्हेवाट लावणारा आरोपी वडगांव ता. रावेर येथील जमील अब्दुल तडवी व चोरीचा माल घेणारा निभोरा बु. ता. रावेर तेथील स्वप्नील वासुदेव चौधरी हा असून चोरीचा माल घेतलेले सावदा येथील राकेश सुभान तडवी, निभोरा बु. येथील ललीत सुनिल पाटील, वडगाव येथील राहूल उर्फ मयूर अनिल पाटील हे आरोपी यांचे कडून शेती साहित्य, एच. टी.पी. मटेरीयल सोडण्याचे मशिन, ५ मोठया बॅटऱ्या, ११ लहान बॅटऱ्या, ३ इन्व्हटर मशिन, ७ मोटार सायकल, ४ पावर ट्रोलर, २ लहान ट्रॅक्टर, १ नॅनो कार, लहान २ सोलर प्लेट, ११ मटेरीयल बॅग, ३ बंडल ठिबक नळ्या तसेच शेती व इलेक्ट्रीक साहित्य असे १२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून निभोरा पोलिस स्टेशन कडील ०५ गुन्हे, यावल पोस्ट चे ०२ गुन्हे, रावेर पोस्ट चे ०१ गुन्हे, मुक्ताईनगर पोस्ट चे ०१ गुन्हे, सावदा पोस्ट ०१ गुन्हे, असे १० गुन्हे उघडीस आणून निभोरा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसानी आरोपीस अटक करून मुद्देमाल हस्तगत करून धडक कारवाई केली.
ही कामागिरी पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर याच्या मार्गदर्शना खाली निभोरा पोलिस स्टेशनचे सपोनि हरिदास बोचरे, पो उप नि. दिपाली पाटील, पो उपनि ममता तडवी यासह निभोरा पोलिस स्टेशनेचे सर्व कर्मचारी याच्या सहकार्याने गुन्हा उघडीस आला या मुळे निभोरा पोलिसाचे कौतुक होत आहे.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
या ठिकाणी आपला व्यवसाय द्विगुणीत करण्याची संधी मिळावा अगदी वाजवी दरात
संपर्क ९४२३१८९५७२, ८४८२९६०९२७, ९४२३९३८६५०
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
















Post a Comment