Khandesh Darpan 24x7

राज्यशास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक सहलीचे आयोजन




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


तापी परिसर विद्यामंडळ संचलित, धनाजी नाना महाविद्यालयाच्या वतीने पाल येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. वाघुळदे यांच्या मार्गदर्शनात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दिं १६ सप्टेबर २०२५ रोजी या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले.




विद्यार्थांनी पाल येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट देवून तेथे चालणा-या विविध प्रशिक्षण योजनांची, उपक्रमांची माहीती जाणून घेतली. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. महेश महाजन यांनी मशरूम कसे तयार केले जाते, त्यासाठी लागणारे कच्चा माल, कमी जागेत कसे उत्पादन करावे या बद्दल प्रत्यक्ष मशरून प्रकल्पाला भेट देवून माहिती दिली. त्यासोबतच मधमाशीका पालन, तेजपान, वेलदोडे लवंग, दालचीनी या मसल्याच्या पीकांची लागवड, सफरचंदांच्या वेगवेगळ्या प्रजातींची लागवड, विविध बांबूंचे प्रकार, भाजीपाल्याच्या रोपवाटीका, केळी, आवळा, ज्वारी, बाजरी, फुल शेती, सेंद्रीय व गांडूळ खताच्या निर्मिती बद्दल माहीती दिली. पाल येथे असणा-या विविध शैक्षणिक संस्थांची माहिती जाणून घेतली.




विद्यार्थांनी पाल भागातील आदिवासी लोकांचे राहणीमान त्यांची संस्कृती व परंपरा या बद्दल माहिती जाणून घेतली. डोंगराळ भागात राहतांना त्यांना येणा-या आर्थीक, आयोग्य, सामाजिक अडचणीबद्द्ल माहीती जाणून घेतली. आदिवासी समुदायासोबत संवाद साधतांना त्या भागात लोकांना आरोग्य विषयक येणा-या समस्या बद्दल जागृती नसल्याचे दिसून आले. 


शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थांना रोजच्या धावपळीच्या जीवनावून एक दिवस निसर्गरम्य वातावरणात व आदिवासी संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची उस्तुकता असल्याने मोबाइलचा वापर केला नाही. विद्यार्थांनी पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून माहीती जाणून घेतली. या शैक्षणिक सहलीचे आयोजन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ताराचंद सावसाकडे प्रा. मंजश्री पवार, प्रा. पल्लवी तायडे यांनी केले.



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




सहप्रायोजक आहे.  

या ठिकाणी आपला व्यवसाय द्विगुणीत करण्याची संधी मिळावा अगदी वाजवी दरात
संपर्क ९४२३१८९५७२, ८४८२९६०९२७, ९४२३९३८६५०

  

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post