Khandesh Darpan 24x7

चिनावल येथे विश्वकर्मा दिन मोठ्या उत्साहात साजरा

 



प्रतिनिधी | चिनावल


येथील नूतन औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात दि. १७ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.



विश्वकर्मा जयंतीनिमित्त, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सप्टेंबर महिन्यात विश्वकर्मा पूजन दिन साजरा केला जातो, जो कामगार आणि कारागिरांचा उत्सव आहे. हा दिवस दैवी शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे कार्य, मेहनत आणि कामातील अचूकतेचे स्मरण करून साजरा केला.



यानिमित्ताने, शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन खेमचंद्र पाटील यांनी सपत्नीक भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजा केली. तसेच उपकरण, यंत्र सामुग्रीची पूजा करून कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्याचप्रमाणे शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष राजेंद्र फालक चेअरमन खेमचंद पाटील, सेक्रेटरी गोपाळ पाटील तथा संस्थेच्या सर्व पदाधिकार्यांनी  उपकरणे, यंत्र सामुग्रीचे विधिवत पूजन केले.



भगवान विश्वकर्मा जयंतीला 'राष्ट्रीय श्रमिक दिन' म्हणून घोषित करण्याची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे, कारण हा दिवस त्याग, कामातील नावीण्यता, व कौशल्य यांचा त्रिवेणी संगम आहे. भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत. त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका, पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली. अशा या सोन्याच्या दिवशी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी आपापल्या शस्त्राचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. 



कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य संदीप चौधरी, फिटर निर्देशक सरजू होले, वि. वी. पाटील, आर. डी. इंगळे, आर. आर. महाजन, वैभव महाजन, तसेच सर्व प्रशिक्षणार्थी यांनी उपस्थिती होती.



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




सहप्रायोजक आहे.  

या ठिकाणी आपला व्यवसाय द्विगुणीत करण्याची संधी मिळावा अगदी वाजवी दरात
संपर्क ९४२३१८९५७२, ८४८२९६०९२७, ९४२३९३८६५०

  

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post