प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभागातील धनुर्विद्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. धनुर्विद्या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड व कंपाऊंड राऊंड स्पर्धा या तीन प्रकारात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून तापी परिसर विद्यामंडळ संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डाॅ. एस. के. चौधरी, तर उदघाटक म्हणून संस्थेचे चेअरमन लिलाधर चौधरी आणि प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन के. आर. चौधरी, मा. प्राचार्य डाॅ. एस. एस. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, प्राचार्य डाॅ. चंद्रमणी लभाने उपस्थितीत होते.
सदर स्पर्धेसाठी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. हरीश नेमाडे, जीमखाना समिती चेअरमन डाॅ. ए. के. पाटील, जळगाव विभागाचे सचिव प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. डॉ. गोविंद मारतळे, डाॅ. मुकेश पवार, डॉ. महेश पाटील, डाॅ. उमेश पाटील, प्रा. माधुरी नारखेडे उपस्थित होते.
स्पर्धेत जळगाव विभागातील चार पुरुष व चार महिला संघानी सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे चेअरमन लिलाधर चौधरी यांनी मनुष्य जीवनात सर्वात मौल्यवान शरीर आहे. मौल्यवान शरीराला प्राप्त करण्यासाठी खेळ उत्तम माध्यम आहे. खेळाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास साधता येतो त्याकरीता सर्वानी खेळात सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष डाॅ. एस. के. चौधरी यांनी सर्व खेळाडूना शुभेच्छा देऊन जय परजायची काळजी न करता खेळाचा आनंद घेत सातत्याने सराव करा असे सुचविले. या सोबतच सर्वांनीच खेळाकडे एक करिअर म्हणून पाहिले पाहिजे व त्या उद्देशानेच खेळाचा नियमीत सराव करून आपले, राज्याचे व देशाचे नाव लौकिक करावे असे सांगितले आणि सर्व खेळाडूंनी सहभाग घेतल्या बदल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
धनुर्विद्या पुरूष गटात धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर- प्रथम, कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद- व्दितीय आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाल - तृतीय तसेच
धनुर्विद्या महिला गटात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाल - प्रथम, धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर - द्वितीय, कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद - तृतीय विजयी झाले. विजय झालेले खेळाडू विभागीय स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयात सहभागी होतील.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी जळगाव जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन चे पंच यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद मारतळे यांनी केले तर आभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा. डॉ. ए. के. पाटील सर, प्रा. डाॅ. गोविंद मारतळे, प्रा. शिवाजी मगर आणि राजेंद्र ठाकुर यांनी परिश्रम घेतले.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
या ठिकाणी आपला व्यवसाय द्विगुणीत करण्याची संधी मिळावा अगदी वाजवी दरात
संपर्क ९४२३१८९५७२, ८४८२९६०९२७, ९४२३९३८६५०
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.















Post a Comment