Khandesh Darpan 24x7

ब्रह्माकुमारींनी नवरात्रोत्सव केला साजरा


प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयातर्फे नवरात्र महोत्सव साजरा केला जातो. या उत्सवामध्ये देवी दुर्गा किंवा शक्तीच्या नऊ रूपांचे स्मरण करून अध्यात्मिक जागृती आणि आनंदाची संधी साधली जाते. विविध ठिकाणी ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रांमार्फत 'चैतन्य नवदुर्गा दर्शन' व अशा कार्यक्रमांचे आयोजन करून आध्यात्मिक संदेश दिला जातो. 





सावदा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व-विद्यालय केंद्रातर्फे नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बऱ्हाणपूर सबझोन इनचार्ज (उपविभाग प्रमुख) आदरणीय राजयोगिनी ब्रम्हकुमारी मंगला दिदी म्हणाल्या की, दुर्गा ही शक्तीचे प्रतीक मानली जाते. म्हणून, ती सिंहावर स्वार होते. दुर्गेला लक्ष्मी, सरस्वती आणि इतर रूपांमध्ये चित्रित केले आहे. भारतात महिलांना आदर दिला जातो आणि दुर्गापूजेदरम्यान मुलींची पूजा करण्याची प्रथा आजही चालू आहे. दुर्गा ही शक्तीचे प्रतीक आहे. लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि सरस्वती ही ज्ञानाची देवी आहे. 



प्रसंगी बीके विकास भाई म्हणाले की, देवींना आठ हातांनी चित्रित केले आहे. खरं तर, अष्टभुजा ही शक्तींचे प्रतीक आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सहनशक्ती, सामावून घेण्याची शक्ती, चाचणी घेण्याची शक्ती, निर्णय घेण्याची शक्ती, सामना करण्याची शक्ती, सहकार्य करण्याची शक्ती, विस्तार कमी करण्याची शक्ती यांचा समावेश आहे. 


1 / 4
2 / 4
3 / 4
4 / 4





कार्यक्रमात शीतल येवले आणि त्यांच्या १२ ते १५ वयोगटातील आठ मुलींच्या ग्रुप ने पारंपारीक बंगाली वस्त्र परिधान करून आकर्षक असे बंगाली धुनुची नृत्य (बंगाली धुनुची नृत्य हे दुर्गापूजेदरम्यान सादर केले जाणारे पारंपारिक भक्ती नृत्य आहे. ज्यामध्ये भक्त ढाकच्या तालावर धुनुची जाळतो. (धूर आणि धूप असलेले मातीचे भांडे) हातात घेवून नाच हे नृत्य शक्ती आणि सशक्तीकरणाचे प्रतीक आहे, जे महिषासुरावर देवी दुर्गेच्या विजयाचा उत्सव साजरा करते. हे नृत्य देवीला समर्पित करण्याचे आणि नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक मानले जाते.) सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. 



कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व समर्पित ब्रह्माकुमारींना चुनरी नेसवण्यात आली होती आणि त्यांच्यासाठी आरती करण्यात आली. नवरात्रोत्सव यशस्वीतेसाठी मिलिंद भाई, विकास भाई, दिपाली बहन, मोहिनी बहन यांनी मोलाचे सहकार्य केले.



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




सहप्रायोजक आहे.  

या ठिकाणी आपला व्यवसाय द्विगुणीत करण्याची संधी मिळावा अगदी वाजवी दरात
संपर्क ९४२३१८९५७२, ८४८२९६०९२७, ९४२३९३८६५०

  

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post