Khandesh Darpan 24x7

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी





प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर स्थानिक गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार मुंबई, यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.





निवेदनात म्हटले आहे की, हल्लेखोर गुंडांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. तसेच, प्रवेशकर वसुली करणाऱ्या ‘ए. एस. मल्टी सर्व्हिसेस’ या कंपनीच्या मालकाविरुद्धही गुन्हा नोंदवून कंपनीला काळ्या यादीत टाकावे आणि महाराष्ट्रात कोणताही ठेका देऊ नये, अशी मागणी संघाने केली आहे.



पत्रकारांनी निदर्शनास आणले की, नोव्हेंबर २०१९ मध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यानंतरही राज्यभरात ३०० हून अधिक पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. मात्र, यापैकी केवळ ४३ प्रकरणांमध्येच या कायद्याचा वापर झाला आहे. शासनाकडून या कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे यावरून स्पष्ट होते. यामुळे गृहमंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत प्रकरणांच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि प्रलंबित प्रकरणांची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.



यावेळी नायब तहसीलदार दीपक पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले. राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्याध्यक्ष संतोष नवले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष योगेश सैतवाल, संतोष बारी, संजय बारी, प्रमोद कोंडे, कैलास लवंगडे, युनूस पिंजारी, राजेश चौधरी, फारुख शेख, अजहर खान, संतोष राठोड, सुरेश पवार, इकबाल पिंजारी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.



पत्रकार हल्ल्याच्या घटना आणि कायद्याची अंमलबजावणी :


पत्रकारांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता, शासनाने पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. स्वतंत्र चौकशी समितीच्या स्थापनेमुळे पत्रकारांना संरक्षण मिळण्यास मदत होईल आणि अशा घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा पत्रकार संघाने व्यक्त केली आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




सहप्रायोजक आहे.  

या ठिकाणी आपला व्यवसाय द्विगुणीत करण्याची संधी मिळावा अगदी वाजवी दरात
संपर्क ९४२३१८९५७२, ८४८२९६०९२७, ९४२३९३८६५०

  

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post