Khandesh Darpan 24x7

सावदा येथील मंदिरात 56 भोग अन्नकूट महोत्सवाचे आयोजन


प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात, येथील प्राचीन विठ्ठल मंदिरात  तसेच स्वामीनारायन मंदिरात दीपावली पाडव्याच्या महूर्तावर '56 भोग अन्नकूट' महोत्सवाचे भक्तिपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. पुरातन अश्या स्वामीनारायण मंदिरात बुधवार रोजी सकाळी 10 वाजता गोवर्धन पूजन तसेच अन्नकुट उत्सव व महाआरती असे धार्मिक कार्यक्रम झाले. तर गांधी चौकातील विठ्ठल मंदिरातदेखील अन्नकुट महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विठ्ठलास 56 भोग नैवेद्य दाखविण्यात आले. माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी सुद्धा मोठ्या संख्येने भाविक, भक्त उपस्थित होते.




या महोत्सवात विविध प्रकारचे 56 पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आले. यात गोड-धोड, मसालेदार, आंबट आणि इतर अनेक चवींच्या पदार्थांचा समावेश होता. भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने हे पदार्थ तयार केले होते. अन्नकूट म्हणजे 'अन्नाचा डोंगर' आणि या परंपरेनुसार, अन्नपदार्थ गोवर्धन पर्वताच्या प्रतिकृतीप्रमाणे मांडले होते. 


या धार्मिक कार्यक्रमाला सावदा शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, आणि भाविक उपस्थित होते. त्यांनी दर्शनासोबतच अन्नकूट या विहंगम दृश्याचाही लाभ घेतला.  नैवेद्य दाखवल्यानंतर, हा सर्व अन्नप्रसाद भाविकांना सामुदायिक भोजनाच्या माध्यमातून वाटण्यात आला. यातून एकता आणि सामुदायिक भक्तीचा संदेश देण्यात आला. अन्नकोट महोत्सवाच्या माध्यमातून, समृद्धी आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच, अशा कार्यक्रमांमुळे धार्मिक आणि सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होते. या वर्षीच्या अन्नकूट महोत्सवाने सावदा शहरातील धार्मिक वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण केला. यावेळी  स्वामीनरायन मंदिराचे स.गु.शास्त्री विश्वप्रकाशदासजी व स.गु.शास्त्री भक्तीप्रियदासजी, शास्त्री सत्यप्रकाशदासजी, कोठारी स्वयंप्रकाशदासजी यांचे सह हरिभक्त मोठ्या संख्यने उपस्थित होते. अन्नकोट चे यजमान दीपक भगत हे असुन् महाप्रसादाचे यजमान विरा भगत यांचे वाढदिवसा निमित्त सावदा स्वामीनारायण मंदिर चे सर्व संतगण हे होते.



या बातमीचे प्रायोजक आहे.

सावद्यातील  स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे  : राधाकृष्ण संकुल  
संपर्क : विलास यशवंतराव पाटील ७५८८८१५१६६ , सागर विलास पाटील ८३२९८३९१७८    



  


सहप्रायोजक आहे.  

  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.






Post a Comment

أحدث أقدم