सावदा नगरपरिषदच्या २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सावदा नगरपरिषद सभागृहात प्रभागनिहाय आरक्षण सोडत उत्साही वातावरणात पार पडली.
या आरक्षण प्रक्रियेमुळे नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत नव्या अपेक्षा निर्माण झाल्या असून, विशेषतः महिलांसाठी आरक्षित जागांच्या वाढीमुळे महिला सहभाग वाढण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. गेल्या महिनाभरापासून निवडणुकीच्या प्रारूप आराखड्याला सुरुवात झाली असून, नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या प्रारंभी निवडणुकीची अधिकृत तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
मंत्रालयात ६ ऑक्टोबर रोजी निघालेल्या आरक्षण सोडतीत सावदा नगराध्यक्षपद अनुसूचित जातीतील (एससी) महिलांसाठी राखीव ठरल्याने अनेक इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नांना धक्का बसला असून दुसरीकडे, या आरक्षणाचा फायदा घेऊन सुभद्रा बडगे ज्यांनी सावदा नगर परिषदेत सन २००६ पासून दिर्घ काळ नगरसेविका हे पद यशस्वी रित्या पार पाडले.
सुभद्रा बडगे यांच्या उमेदवारीला जोरदार चालना मिळाली असून, त्या भावी नगराध्यक्ष म्हणून सर्वाधिक चर्चेत आहेत. त्यांचा समाजातील गोरगरीब जनतेशी असलेला संपर्क तसेच हुन्नरी नेतृत्व यामुळे त्या पुन्हा एकदा नगरपालिकेत प्रभावी नेतृत्व देऊ शकतील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

















Post a Comment