Khandesh Darpan 24x7

माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष एस. डी. भीरुड यांचा सेवानिवृत्तीबद्दल सन्मान :



खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -


"संघर्षातून माणूस घडत असतो, चांगल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करावी, कोणतेही कार्य सर्वांच्या मदतीने शक्य होते. आई-वडिल हे प्रेरणा स्त्रोत आहे. त्यांची सेवा करावी." असे विचार माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतपेढी चे अध्यक्ष तथा भगीरथ हायस्कूल जळगाव चे माध्यमिक शिक्षक एस. डी. भिरूड यांनी व्यक्त केले. 





एस. डी. भिरूड हे नियतवयोमानाने सेवानिवृत्त झाल्याने त्यांना इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी, सावदा च्या सदस्यांनी त्यांच्या सेवापुर्ती प्रसंगी शुभेछ्या देताना सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. सेवापुर्ती सोहळ्यात इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अकबर खान, माजी प्राचार्य रऊफ सर (यावल), सोसायटीचे सहसचिव अकरम खान यांच्यासह शिक्षक जुबेर खान व असगर खान उपस्थित होते. 



सोसायटीच्या वतीने भिरूड सरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी भिरूड सरांना शुभेच्छा देताना अकबर खान म्हणाले, "एस. डी. भिरूड हे मितभाषी व्यक्तिमत्त्व, त्यांनी अनेक कुटुंब जोडली. या त्यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी उपस्थितांची मोठी संख्या हेच त्याचे उत्तम उदाहरण आहे. शिक्षक समाजाला दिशा देतात. शिक्षणामुळे परिवर्तन घडते. सरांनी हे काम प्रामाणिकपणे केले. ते रिटायर झाले असले तरी त्यांनी शिकवणी वर्ग घेऊन ज्ञानदान सुरू ठेवावे", असे आवाहन त्यांनी केले. 



तसेच "पतपेढी च्या माध्यमातून जास्तीत जास्त सभासद संख्या वाढवून सभासदांना एकत्र आणून तसेच सभासदांना आधुनिक सेवा, कर्ज योजना आणि आर्थिक स्थैर्य या सर्वांची योग्य वाटचाल करून पतपेढीला अधिक मजबूत करण्याचे कार्य भिरूड सरांच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादनअकरम खान यांनी यावेळी केले.




या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



  


सहप्रायोजक आहे.  

  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post