सावदा येथे छाननीच्या दिवशी भाजपला लॉटरी लागली. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जासोबत एबी फॉर्म नसल्याने प्रभाग ७ अ मधून रंजना भारंबे यांचा बिनविरोषध विजयाचा मार्ग मोकळा झाला. शिंदे गटाच्या तब्बस्सूमबानो फिरोजखान पठाण यांच्या विरोधातील अजित पवार गटातील उमेदवाराचा अर्ज तिसरे अपत्य असल्याने बाद झाला. यामुळे येथे युतीला लॉटरी लागली. मात्र, अद्याप बिनविरोधची घोषणा झाली नाही. यापैकी प्रभाग २ ब आणि १० ब मधील उमेदवारी बाद झालेले दाम्पत्य न्यायालयात जाणार आहेत.
मंगळवारी सकाळी ११ वाजता पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी कक्षात अर्ज छाननी सुरू झाली. नगराध्यक्ष पदासाठी १० व नगरसेवक पदासाठी १० प्रभागातून २० जागांसाठी प्राप्त १४५ अर्जांची छाननी झाली. त्यात नगराध्यक्ष पदाचे २ (८ वैध) आणि नगरसेवक पदाचे ३३ (११२ वैध) अर्ज बाद झाले. बहुतांश अर्ज एबी फॉर्म नसल्याने बाद झाले. सर्वात रंजक घडामोड प्रभाग ७ अ मध्ये घडली. येथे रंजना जितेंद्र भारंबे (भाजप), हेमांगी राजेंद्र चौधरी (भाजप) व रेखा राजेश वानखेडे (राष्ट्रवादी अजित पवार गट) असे ३ अर्ज आले होते. यात हेमांगी चौधरी व रेखा वानखेडे यांनी पक्षातर्फे असलेले एबी फॉर्म जोडलेले नव्हते, त्यामुळे दोघांचे अर्ज बाद ठरले. परिणामी भाजपच्या रंजना भारंबे येथे बिनविरोध विजयी होतील पण अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही. दरम्यान प्रभाग क्रमांक १० अ मध्ये रेखा वानखेडे या राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या अधिकृत उमेदवार आहेत.
हरकत मान्य होताच केला जल्लोष
प्रभाग क्रमांक २ ब मध्ये उमेदवार आसमाबी शेख अल्लाबक्ष यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार तब्बसुमबानो फिरोज खान यांचे सुचक शेख मिर्झा शहीद बेग यांनी तीन अपत्य असल्याची हरकत घेतली. प्रभाग १० ब मध्ये शेख अल्लाबक्ष शेख नजीर यांच्या विरोधातील उमेदवार फिरोज खान हबीबउल्ला खान पठाण यांनीही ३ अपत्य असल्याची हरकत घेतली होती. आसमाबी शेख अल्लाबक्ष व अल्लाबक्ष शेख नजीर हे दोघे पती पत्नी असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीवरील हरकतींचा निकाल सायंकाळी ६ वाजता आला. त्यात निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी ३ अपत्य असल्याप्रकरणी अल्लाबक्ष शेख नजीर व आसमाबी शेख अल्लाबक्ष या पती-पत्नीचे अर्ज बाद ठरविले. यामुळे त्यांच्या समर्थकांत नाराजी, तर हरकत मान्य झाल्याने विरोधकांनी फटाके फोडले.
उमेदवार आसमाबी न्यायालयात जाणार
प्रभाग २ मध्ये शिंदे गटाच्या तब्बसुमबानो फिरोज खान पठाण यांचा अर्ज आहे. त्या जवळपास बिनविरोध झाल्या आहेत. मात्र ज्यांचे विरोधात त्यांनी तीन अपत्य असल्याचा आक्षेप घेऊन त्यांचा अर्ज बाद झाला त्या आसमाबी शेख अल्लाबक्ष या न्यायालयात दाद मागणार असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे सांगण्यात आले.
सावद्यातील स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे : राधाकृष्ण संकुल
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.











Post a Comment