महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपने पहिला मोठा विजय मिळवला आहे. बिनविरोध निवड झालेला पहिला नगराध्यक्ष भाजपचा आहे.
खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळत आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान घेतलं जाणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपने पहिला मोठा विजय मिळवला आहे. भाजपचा पहिला नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आला आहे.
राज्यात पालिका निवडणुकीत भाजपने खातं उघडल आहे. धुळे जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपने खात उघडलं आहे. धुळ्यातील दोंडाईचा पालिकेत नगराध्यक्ष पदाचा पाहिला निकाल भाजपाच्या बाजुने लागला आहे. दोंडाईचा नगर पालिका नगराध्यक्ष पदी भाजपाच्या नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोंडाईचा येथे विरोधी उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने रावल यांची बिनविरोध निवड झाली. 26 पैकी 7 नगरसेवकही बिनविरोध निवडले गेले आहेत. खांदेशात भाजपाची विजयी सुरुवात झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पहायला मिळत आहे.
दोंडाईचा नगरपरिषदेचा मालमत्ता कर थकवल्याच्या मुद्द्यावरून भाजपाचे डॉ. रवींद्र देशमुख यांनी हरकत घेतली होती. सुनावणीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाळणी अंती उमेदवारी अर्ज बाद ठरवला. दोंडाईचा नगर परिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्ष पदी नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. राज्याचे राज्य शिष्टाचार आणि प्रधानमंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयन कुवर रावल बिनविरोध निवडून आल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने नयनकुवर रावल बिनविरोध निवडून आल्या आहेत. याची अधिकृत घोषणा बाकी आहे.
या बातमीचे प्रायोजक आहे.
सावद्यातील स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे : राधाकृष्ण संकुल
सावद्यातील स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे : राधाकृष्ण संकुल
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.











Post a Comment