Khandesh Darpan 24x7

खिरोद्यातील तरुणाची वायूदलात निवड: परिस्थितीवर मात करत मिळवले यश




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी




रावेर तालुक्यातील खिरोदा या गावातील धोबी समाजाचा रहिवाशी तसेच गरीब सामान्य कुटुंबातील प्रथमेश योगेश सोनवणे याची भारतीय वायू सेना मध्ये नुकतीच निवड झाली. प्रथमेश चे प्राथमिक शिक्षण खिरोदा येथील जि. प. मराठी मुलांची शाळा तसेच माध्यमिक शिक्षण धनाजी नाना विद्यालय खिरोदा येथे पूर्ण केले. 




माध्यमिक शिक्षण घेताना नियमित पहाटे ५ वाजता व्यायामला जाणे, सुट्टीच्या दिवशी आई-वडिलांसोबत शेतात कामाला जाणे. प्रथमेश चे आजोबा भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त असल्याने आपणही आजोबांप्रमाणे देश सेवेसाठी परिपूर्ण सेवा करावी असा मनात निश्चय ठेवून जिद्दीने व चिकाटीने आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी रोज दिवस रात्र ग्राउंड व अभ्यास केला. त्याला काहीहि करून सैन्यात भरती व्हायचं होते. 



त्याने सैन्य भरतीचं स्वप्न बाळगलं होतं. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरु होते. वायुसेनेत निवड होण्यासाठी अग्निवीर परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते ती परीक्षा प्रथमेश ने पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली. आणि त्याची निवड भारतीय वायुसेनेत झाली, स्वप्न पूर्णात्वाला आलं. 



खिरोदा परिसरातून भारतीय वायू सेनेत हि पहिलीच निवड आहे. त्याची जिद्द, मेहनत फळाला आली असून प्रथमेशच्या या कामगिरीबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आम्हा सर्वांना या निवडीचा सार्थ अभिमान असल्याचं मत त्यांच्या वर्गमित्रांनी व्यक्त केला. माझ्या आई-वडिलांची तथा आजोबांची इच्छा होती. की, मी सुद्धा सैन्य दलात भरती होवून देश सेवा करावी. त्यांनी मला शेतात मजुरी करून कष्ट करून शिकवले. आई-वडिलांचं स्वप्न आज खरे ठरलेले आहे. 



मला मोठं करण्यात माझ्या आई वडिलांचाच तथा आजोबांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच सैन्य दलात जाण्याचा विचार केल्यानंतर अविरत शारीरिक कसरत, परिश्रम व सातत्यपूर्ण सराव, यामुळंच मला यश मिळालं आहे. तसेच माझे धनाजी नाना विद्यालय खिरोदा येथील सर्व शिक्षक यांचा देखील माझ्या यशात मोलाचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया प्रथमेश ने व्यक्त केली. प्रशिक्षणासाठी प्रथमेश कर्नाटक बेळगाव येथे लवकरच जाणार असल्याचे समजते.






या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



  

सहप्रायोजक आहे.  

  




विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post