Khandesh Darpan 24x7

विनाथांबा’ ई-शिवाई बस… जळगावहून नाशिकला पोहोचता येणार रेल्वेच्या वेगाने !




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


एसटीच्या जळगाव विभागाकडून सकाळी नाशिक जाण्यासाठी पहिली विनाथांबा ई-शिवाई बस सुरू करण्यात आली आहे.




एसटीच्या जळगाव विभागाकडून सकाळी नाशिक जाण्यासाठी पहिली विनाथांबा ई-शिवाई बस सुरू करण्यात आली आहे. या नवीन बस सेवेमुळे जळगावहून नाशिकला जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होत असल्याने प्रवाशांना रेल्वे प्रमाणेच वेगवान प्रवासाचा अनुभव मिळत आहे.



एसटीच्या जळगाव विभागाने सार्वजनिक प्रवासी वाहतुकीत मोठी झेप घेतली असून, ई-शिवाई इलेक्ट्रिक बससेवेचा महत्वपूर्ण विस्तार करण्यात आला आहे. विभागात ४२ नव्या ई-शिवाई इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्याने प्रवाशांना आता अधिक आधुनिक, प्रदूषणमुक्त आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.





नव्याने आलेल्या ई-बसेसमध्ये नऊ मीटर लांबीच्या १७ आणि १२ मीटर लांबीच्या २५ बसेसचा समावेश आहे. पैकी नऊ मीटरच्या १२ बसेस जळगाव आगाराला तसेच ५ बसेस चोपडा आगाराला देण्यात आल्या आहेत. तर १२ मीटरच्या १५ बसेस जळगाव आगाराला आणि १० बसेस चोपडा आगाराला देण्यात आल्या आहेत. नऊ मीटर लांबीच्या ई-शिवाई बसेस एका वेळी चार्जिंग केल्यानंतर साधारण २०० किलोमीटरपर्यंत तर १२ मीटर लांबीच्या बसेस साधारण २८० किलोमीटर पर्यंत धावण्याची क्षमता ठेवतात.



धावण्याची क्षमता लक्षात घेता जळगाव आणि चोपडा आगारांनी विविध महत्त्वाच्या मार्गांवर ई-शिवाई बससेवा सुरु केली आहे. नवीन मार्गांमध्ये छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अकोला, बीड, नंदुरबार, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, अमळनेर आणि रावेर या शहरांचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक बससेवेच्या विस्तारामुळे एसटी विभागाच्या सेवेत केवळ आधुनिकता वाढलेली नाही, तर प्रदूषणमुक्त प्रवासाच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.



जळगाव विभागात ई-शिवाई बससेवेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी वेगाने सुरू झाली असून, या टप्प्यात एकूण ९९ नवीन इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. यापैकी ३५ बसेस जळगाव आगारासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत, तर उर्वरित बसेस पाचोरा, चाळीसगाव आणि मुक्ताईनगर या आगारांना वितरीत केल्या जाणार आहेत. नव्या ई-बसेस सुरू करण्यापूर्वी संबंधित आगारांमध्ये अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.



दरम्यान, जळगाव-नाशिक मार्गावर सध्या दिवसातून चारवेळा ई-शिवाई बसेस सोडल्या जात आहेत. नव्या वेळापत्रकानुसार जळगावहून नाशिकला धावणाऱ्या ई-शिवाई बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. पहिली बस सकाळी सहा वाजता जळगाव स्थानकातून सुटते आणि ही बस विनाथांबा थेट नाशिकला पोहोचत असल्याने प्रवाशांचा बराच वेळ वाचतो. याशिवाय सकाळी नऊ वाजता, दुपारी १.३० वाजता, दुपारी चार वाजता जळगावहून नाशिकसाठी ई-शिवाई बस सोडल्या जातात.



सकाळी सहा वाजता सुटणारी एक्सप्रेस बस वगळता इतर सर्व बसेस जळगाव-नाशिक मार्गावरील एरंडोल, पारोळा, धुळे, मालेगाव या प्रमुख स्थानकांवर थांबे घेतात. ज्यामुळे वाटेतही प्रवासी चढ-उताराची सुविधा मिळते. जळगाव-नाशिक ई-शिवाई बसचे संपूर्ण तिकीट दर ६९३ रुपये आहे. विनाथांबा बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीचे प्रवास भाडे मोजावे लागत नाही.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



  

सहप्रायोजक आहे.  

  




विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post