Khandesh Darpan 24x7

सावद्यात युतीमुळे भाजप विजयाचा मानकरी : माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांचा धक्कादायक पराभव



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


सावद्यातील निवडणुकांमध्ये युतीच्या यशाने भाजपला विजय मिळवून दिला आहे तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्थानिक राजकारणातील या महत्त्वाच्या परिवर्तनाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. 



       विजयी नगराध्यक्ष

           

रेणुका पाटील १७३ मतांनी विजयी 

एकूण मते :  ६८२७ मताधिक्य : १७३ 

पराभूत : सुभद्रा बडगे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) मते ६६५४ 


विजयाची कारणे :

 

सावदा शहरात भाजपाची संघटनात्मक बांधणी, शिवसेनेसोबत झालेली युती, लेवा मतदारांचा प्रभाव, कमकुवत विरोधक



सावदा नगरपालिका निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजप-सेना युतीच्या रेणुका पाटील (भाजपा उमेदवार) यांनी प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुभद्रा सिद्धार्थ बडगे यांचा १७३ मतांनी पराभव केला. अटीतटीच्या लढतीत शेवटपर्यंत निकालाची उत्सुकता कायम राहीली. 


सावदा पालिका सभागृहात मतमोजणी झाली. त्यात एकूण १४५४२ पैकी १४३५६ मते वैद्य ठरली. ८६ मते अवैध आढळून आली. टपाली मतपत्रिकेद्वारे ४ मते प्राप्त झाली. उमेदवार निहाय निकाल पाहता रेणुका पाटील यांनी ६८२७ मते तर सुभद्रा बडगे यांना ६६५४ मते मिळाली. निकालामुळे सावदा शहरात युतीच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी एकच जल्लोष केला. 



भाजपाचा गड आला पण 


भारतीय जनता पार्टीचा गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती झाली आहे. भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी यांचा त्यांच्याच प्रभागात धक्कादायक १२ मतांनी पराभव झाला आहे. शहरातील जनतेचा कौल मान्य असून नगराध्यक्षांच्या माध्यमातून विविध विकास कामे शहरात केली जातील माझा झालेला पराभव हा घटक पक्षांच्या नाराजीमुळे झाल्याचे राजेंद्र चौधरी यांनी माध्यमांना सांगितले.



सावदा पालिका विजयी उमेदवार 


प्रभाग १ अ : गणेश (विशाल) भागवत सोनवणे (ट्रॅक्टर, अपक्ष) विजयी मतं ४९९  लीड ४७ 




प्रभाग १ ब : सिमरन राजेश वानखेडे (घड्याळ, राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी मते ५४८  लीड ४७ 
(५ मतांनी विजयी)


प्रभाग २ अ : राजेश गजानन वानखेडे (घड्याळ, राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी मते ६४२  लीड ५७१ 





प्रभाग २ ब : तब्स्सुम बानो फिरोज खान पठाण (धनुष्यबाण, शिवसेना शिंदे गट) बिनविरोध विजयी




प्रभाग ३ अ : विशाल प्रेमचंद तायडे (घड्याळ, राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी मते १०९५  लीड ४८१ 



प्रभाग ३ ब : सुनिता संजय तायडे (छताचा पंखा, अपक्ष) विजयी मते ६३४  लीड ६५ 



प्रभाग ४ अ : नकुल नितीन बेंडाळे (कमळ, भाजपा) विजयी मते ११०९  लीड ८४३ 

 

प्रभाग ४ ब : विजया कुशल जावळे (घड्याळ, राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी मते १०७४  लीड ६९९  



प्रभाग ५ अ : जयश्री अतुल नहेते (कमळ, भाजपा) विजयी मते ११८७  लीड ७७२



प्रभाग ५  ब : सचिन चुडामण 
बऱ्हाटे (कमळ, भाजपा) विजयी मते ८४२  लीड ७६  




प्रभाग ६ अ : प्रतीक्षा मनीष भंगाळे (धनुष्यबाण, शिवसेना शिंदे गट) विजयी मते ६५४  लीड २७२ 



प्रभाग ६ ब : फिरोजखा अबदार खा (धनुष्यबाण, शिवसेना शिंदे गट) विजयी मते ५८९   लीड ४०



प्रभाग ७ अ : रंजना जितेंद्र भारंबे (कमळ, भाजपा) बिनविरोध विजयी 



प्रभाग ७ ब :  शाम अविनाश अकोले (बॅट, अपक्ष) विजयी मते ४१८  लीड ८९



प्रभाग ८ अ : सीमा वेडू लोखंडे(घड्याळ, राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी मते ६६८  लीड ११३



प्रभाग ८ ब : पंकज राजाराम येवले (कमळ, भाजपा) विजयी मते ६७०  लीड ३४




प्रभाग ९ अ : रेखा राजेश वानखेडे (घड्याळ, राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी मते ५९४  लीड १०७



प्रभाग ९ ब : हेमंत रुपा 
महाजन (घड्याळ, राष्ट्रवादी अजित पवार गट) विजयी मते ५१७  लीड १० 


प्रभाग १० अ : रुक्सार शेख सलीम अहमद पिंजारी (धनुष्यबाण, शिवसेना शिंदे गट) विजयी मते ६६९  लीड १७०  



प्रभाग १० ब : फिरोज खान हबीबुल्ला खान 
पठाण (धनुष्यबाण, शिवसेना शिंदे गट) बिनविरोध विजयी





या निकालांमुळे सावदा नगरपरिषदेत भाजप सेना युतीचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



  

सहप्रायोजक आहे.  

  




विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.







Post a Comment

Previous Post Next Post