मागण्या मान्य न केल्यास बेमूदत शाळा बंद करू
15 मार्च 2024 च्या शासन निर्णयात बदल न झाल्यास तसेच टिईटी बाबत शासनाने निर्णय न घेतल्यास बेमूदत शाळा बंद करण्यास पुढे मागे पाहिले जाणार नाही असा इशारा मुंबई मुख्याध्यापक संघटनेने शासनाला दिला.
यावेळी बृहन्मुंबई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे, उपाध्यक्ष जयसिंग कदम, कोषाध्यक्ष मीनल सरकाळे, गणेश कांबळे, पश्चिम विभागाचे अध्यक्ष रियाज खान, सहसचिव आशिष वशी, यासह मुंबईतील मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात
1) सरसकट सर्व शिक्षकांसाठी TET उत्तीर्ण होण्याची घातलेली अट रद्द करणे.
2) 15 मार्च 2024 चा अन्यायकारक शासननिर्णय रद्द करणे.
3) 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व विभागातील शिक्षकांना जुनी पेंशन योजनालागू करणे.
4) शिक्षकांना 10-20-30 वर्षाची आश्वासीत प्रगती योजना लागू करणे.
5) शिक्षणसेवक पद रद्द करून सुरुवातीपासून शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक करणे.
मागण्या करण्यात आल्या.
बेमूदत शाळा बंद आंदोलनाची वेळ आणू नका- अनिल बोरनारे
15 मार्च 2024 च्या शासन निर्णयामुळे शाळांमधील शिक्षक अतिरिक्त होऊन शेकडो शाळा शून्य शिक्षकी होणार आहेत या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकविणार कोण? हजारो विद्यार्थी शिक्षकविना शाळेत असतील. विद्यार्थ्यांची गळती होईल यासाठी संच मान्यतेच्या निकषात बदल करण्याची गरज असून जुन्या संच मान्यतेप्रमाणे शिक्षक संख्या द्यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत .
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
![]() |
| विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे. |
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.













إرسال تعليق