नागपूर महानगरपालिकेचा जनतेच्या आरोग्याशी खेळ, प्रभाग २९ मधून वाहत असलेल्या पोहरा नदीत सिवरेज पाईप (सांडपाण्याचे पाईप) सोडल्या ...
प्रतिनिधी | नागपूर
नागपूर येथील प्रभाग ३४ पिपळा रोड पुलाजवळ सीवरेज लाईन चे पाईप पोहरा नदीत डायरेक्ट सोडले असून प्रभाग २९ मधून याचा प्रवाह जात असताना नरसाळा भागात २० mlt Stp प्लांट नरसाळा भागात असून पोहरा नदीच्या नाल्यातूनच पाणी पुरवठा नाल्या चा प्रवाह गेट बंद केल्याने पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात थांबतो व सर्वी कडे पाणी प्रवाह थांबल्याने दुर्गंध पसरतो.
पिपळा रोड, हुडकेश्वर रोड व नरसाळा भागात दुर्गंधी पसरली असून पोहरा नदीच्या पुलावरून आवागमन करणाऱ्या तसेच नदीच्या आजूबाजूला असणाऱ्या साईनगर, गणेश धाम, श्याम नगर, पवन नगर, सेंट पॉल शाळा, आदर्श शाळा, एस ओ एस स्कूल भाग असलेल्या लोकवस्तीतील जनता दुर्गंधी ने त्रस्त झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
पोहरा नदीच्या आजूबाजूला अनेक शाळा व दाट लोकवस्ती असून अनेक नागरिक पायदळ व वाहनांनी, स्कूल बसेस अनेक नागरिक रोज हुडकेश्वर पुलावरून तथा पिपळा पुलावरून शाळा, कॉलेज मध्ये जाण्यासाठी आवा गमन करत असतात.
प्रशासनाने तात्काळ संबंधित विषयाची दखल घेऊन त्वरित उपाययोजना करून पोहरा नदीचे दूषिति करण थांबवणे व जनतेच्या सुरक्षित आरोग्याला प्राथमिकता देण्याचे कार्य करावे. अशी मागणी शिवसेना विधानसभा संघटक विशाल कोरके यांच्या तर्फे करण्यात आली.
या निवेदनाला प्रामुख्याने शहर संघटिका निलीमा शास्त्री, उपविभाग प्रमुख किरण शेळके, विभाग प्रमुख उज्वला उंमरे उपविभाग प्रमुख नलिनी सदावरती, प्रभाग संघटक किशोर रंदई, रूपाली लाखे, अनिता डोमळे, उज्वला शंभरकर, सोनाली उमरे, आरती शर्मा इत्यादी उपस्थित होते.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.















Post a Comment