कृषी विज्ञान केंद्र पाल व कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला.
पाल येथे शेतकरी व कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक मृदा दिनाचे अवचित्य साधून उपस्थित सर्व अधिकारी व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य बाबत तांत्रिक माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
प्रसंगी पाल येथील प्रगतिशील शेतकरी राजू एकनाथ चौधरी यांना मृदा आरोग्य पत्रिका देऊन शेतकऱ्यांना मृद आरोग्य बाबत जागृती करण्यात आली. त्याच अनुषंगाने परिसरामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागी रॅलीमध्ये मृदा आरोग्य बाबत प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रम दरम्यान ऑस्ट्रेलिया येथील जेसन सार्जट व स्विंनबर्न टेक्नॉलॉजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व कार्यक्रमांमध्ये मृदा बाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
प्रा.महेश महाजन (प्रभारी प्रमुख कृषी विज्ञान केंद्र पाल) यांनी जागतिक मृदा दिन साजरा करण्या मागील भूमिका व तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्तावना सचिन गायकवाड मंडळ कृषी अधिकारी रावेर यांनी केली या कार्यक्रम दरम्यान विविध मृदा आरोग्याचे विषय घेऊन मृदा आरोग्य प्रतिज्ञा घेण्यात आली. या प्रशिक्षण वर्गात परिसरातील शेतकरी व कृषी विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विजय चव्हाण ज्वारी पीक स्पर्धा विजेता राहणार वाघोदा जिल्हा जळगाव, धीरज नेहेते उपस्थित होते.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.















Post a Comment