रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे सालाबादप्रमाणे श्री दत्तात्रय प्रभू जयंतीनिमित्त ५ डिसेंबर शुक्रवार रोजी श्री दत्तात्रय प्रभूची पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील पालखी सोहळ्याला सुमारे १५० वर्षाची परंपरा आहे.
नवसाला पावणारे महानुभाव पंथाचे देवस्थान असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. येथे श्रीकृष्णज्ञान मंदिर (मोठा मठ) बेडीचा मान चढवण्यास व उतरवण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. यावेळी पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात गर्दी केली श्री तसेच श्री दत्त मंदिर (लहान मठ) दत्त जयंती निमित्त मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती.
यावेळी सकाळी मंगलमूर्ती स्नान, विडाअवसर, उपहार, नंतर ५ वाजता श्री दत्तात्रय प्रभूची पालखीला सुरवात झाली सर्व प्रथम आचार्य वाघोदेकर बाबा शास्त्री, महंत दिवाकर बाबा शास्त्री यांनी पुजन केले. यानंतर पालखीला सुरवात झाली. पालखीने गावातील प्रमुख मार्गावरून ग्राम प्रदक्षिणा केली. ठीक ठीक ठिकाणी भाविकांनी पूजन केले. श्रीदत्तात्रेय प्रभूच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. यावेळी सावदा पोलीस स्टेशनचे स.पो.नी. विशाल पाटील यांच्या सह कर्मचारी व गृहरक्षक दल यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यात्रे मध्ये विविध खेळण्याची व खाऊचे दुकाने तसेच संसार उपयोगी साहित्याची दुकाने थाटली होती.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.














Post a Comment