प्रतिनिधी | जळगाव
जळगांव येथील कांचननगरात श्री गुरू दत्त बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागृत गुरुदत मंदीरात श्री गुरुदत्त जयंती मोठ्या उत्साहात व आनंदाने संपन्न झाली. सकाळी पाच वाजता मूर्ती अभिषेक व होमहवन, काकड आरती मंदीराचे विश्वस्त रितेश आणि ममता कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान ह.भ.प. उमेश महाराज जळगांवकर यांचे काल्याचे किर्तन झाले. दुपारी १२ वाजता महाआरती आणि सामाजिक व आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ सेवा देणाऱ्या व्यक्तींना गुरुदत सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावर्षी नामदेव बळीराम पाटील, उमेश आधार पाटील व लिलाधर माधव कोळी यांना पुरस्कार वितरण केले गेले.

विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.
प्रसंगी नगरसेवक विलास बाविस्कर, मुकुंद सोनवणे, आदिवासी वाल्मिकी सेना अध्यक्ष योगेश बाविस्कर, राष्ट्रीय हिंदू संघटना जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुरेश वाघ, राष्ट्रीय हिंदू संघटना उपाध्यक्ष नागराज महाजन, महामंत्री राजेशजी बंसल, उप महामंत्री ओम प्रकाश जोशी, जिल्हा सचिव राजेंद्र बारी हे उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील, अक्षय सोनवणे, रोहन सोनवणे, दिनेश सोनवणे व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर सोनवणे यांची उपस्थिती होती. दुपारी १२.३० ते ४.०० वाजता महाप्रसाद कार्यक्रम संपन्न होऊन संध्याकाळी ६ ते ७ हरीपाठ संपन्न झाला. रात्री दत्त जन्मावर ह.भ.प.संजय महाराज फत्तेपूरकर यांचे किर्तन झाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्य विश्वस्त राजेंद्र कोळी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी साठी दिनेश सोनवणे, उमेश सोनवणे, प्रभाकर धनगर, मेघराज पाटील, तेजस कोळी, सतिश सोनवणे, हर्षल साळुंखे, करण कोळी, नाना कोळी, राजू ठाकूर, भावेश कोळी, भूषण साळुंखे, एकनाथ शिंपी, प्रभाकर सोनार यांनी परिश्रम घेतले.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
![]() |
| विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे. |
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.














Post a Comment