Khandesh Darpan 24x7

शैक्षणिक सहल यशस्वी — विद्यार्थ्यांना अविस्मरणीय अनुभव



प्रतिनिधी | चिनावल  



शिक्षण प्रसारक मंडळ चिनावल संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर चिनावल येथे भव्य शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, संस्कृती व विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा हा हेतू ठेवून ही सहल अत्यंत नियोजनबद्धरीत्या राबविण्यात आली. या दोन दिवसीय सहलीत भद्रा मारुती, घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला, संत एकनाथ महाराज समाधी व पैठण येथील मंदिरे, पैठण मधील संत ज्ञानेश्वर उद्यान, सिद्धार्थ गार्डन, तसेच छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय या महत्त्वाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ठिकाणांना भेट देण्यात आली. 


विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवाद्वारे इतिहास, कला आणि संस्कृतीची सखोल ओळख करून घेतली. सहलीसाठी एस.टी. महामंडळाच्या बसद्वारे सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. सहलीचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष सुनील भास्कर महाजन, चेअरमन खेमचंद गोवर्धन पाटील, संचालक विनायक कमलाकर महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले. संपूर्ण सहलीचे नेतृत्व मुख्याध्यापक गणेश सुभाष बाविस्कर यांनी केले.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.


सहलीचे नियोजन उपशिक्षिका हर्षाली कोल्हे, सपना टोके, कविता नेमाडे, उपशिक्षक संतोष काळे, मिलिंद गारसे, नितीन महाजन, यांनी केले तर शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत लक्ष्मण कुरकुरे, योगेश बोरोले यांची उपस्थिती लाभली. 


एस.टी. महामंडळाचे चालक प्रदीप सूर्यवंशी यांनी सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक सेवा पुरवली. विद्यार्थ्यांनी संपूर्ण सहलीत आदर्श शिस्त व जबाबदारीचे पालन केले. तसेच शिक्षकांवर विश्वास ठेवून सहलीस परवानगी देणाऱ्या सर्व पालकांचे मुख्याध्यापकांनी मनःपूर्वक आभार मानले. ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवृद्धी, सामाजिक शिस्त, समूहभाव आणि सांस्कृतिक जाण वाढवणारा एक समृद्ध व अविस्मरणीय अनुभव ठरली.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   




  


सहप्रायोजक आहे.  

  




विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post