Khandesh Darpan 24x7

फरदापुर येथे संपन्न झालेल्या निसर्ग चित्रकलेत स.ल.भवन खिरोदा अव्वल स्थानी



प्रतिनिधी | खिरोदा 

चित्रकला महाविद्यालया मधील विद्यार्थ्यांना निसर्ग चित्रणाची आवड निर्माण व्हावी, रुची निर्माण व्हावी प्रत्यक्ष निसर्ग चित्रणाचा आत्मविश्वास रुजून वृद्धिंगित व्हावा व परिसरातील रसिकांना कलेचा आस्वाद घेण्यात यावा या उद्देशाने निसर्ग चित्रकार सप्तपुट ललितकला भवन खिरोदा चे माजी प्राचार्य स्व. सी. एन. पाटील यांच्या स्मरणार्थ अजिंठा कला महोत्सव अंतर्गत राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्गचित्र स्पर्धा दि. ११ जानेवारी २०१६ रोजी अजिंठा कला महोत्सव फरदापुर च्या सांगता समारोहात उत्साहात पार पडली. 


या स्पर्धेत एकूण ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा संपूर्ण मोफत होती. स्पर्धेत विजेत्यांना संजय गरुड शेंदुर्णी, प्राचार्य अतुल मालखेडे खिरोदा, प्राचार्य संदीप पाटील पाचोरा यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, आणि रोख रक्कम व पुष्पगुच्छ या स्वरूपात सन्मानित करून शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आल्या. स्पर्धेत




प्रथम विजेता -- स.ल.भवन खिरोदा चा पुष्कर नारायण पाटील, द्वितीय विजेती - स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालय पाचोरा ची नेहा ज्ञानेश्वर पाटील, तृतीय विजेता - स.ल.भवन खिरोदा चा प्रदिप राजू वाघ हे ठरले असून उत्तेजनार्थ बक्षिसे - स. ल. भवन. खिरोदा ची स्तृती प्रविण ओहोळ आणि ललित कला महा. जळगाव ची प्रेरणा घनश्याम मोरे यांनी पटकावली. सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे


माजी आमदार शिरीषदादा चौधरी, संस्था अध्यक्ष काशिनाथ रामभाऊ चौधरी, सचिव अजित पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा  : क्रीष्णाज मेकअप स्टुडीओ   


सहप्रायोजक आहे.  


  




विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.






Post a Comment

Previous Post Next Post