प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
दि. १३ रोजी सावदा नगरपालिका भवनात झालेल्या पहिल्या विशेष सभेस लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रेणुका पाटील यांनी पीठासीन अधिकारी म्हणून अध्यक्षता केली. मुख्याधिकारी भूषण वर्मा, प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया शांतपणे पूर्ण झाली. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सुरुवातीला काही क्षण तणावपूर्ण राहिले, परंतु नंतर सर्वपक्षांच्या सहकार्याने व एकमताने फिरोज खान यांची निवड झाल्याने वातावरणात सौहार्द्य प्रस्थापित झाले.
उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीव्यतिरिक्त, स्वीकृत नगरसेवक पदांसाठीही निवडणुका पार पडल्या. भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीतर्फे सुरज सिंग परदेशी (बद्री) यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तर्फे सुनील (बंटी) जंगले यांना स्वीकृत नगरसेवकपदी निवडून आणण्यात आले.
युतीची ही यशस्वी बैठक आणि फिरोज खान यांच्या निवडीनंतर सावद्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. नवनिर्वाचित नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांच्या मोठ्या गर्दीने नगर पालिका प्रांगणात आनंदोत्सव साजरा केला. युतीच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे शहरातील राजकीय वातावरणात उत्साह आणि सकारात्मकता पसरली आहे.
स्थानिक नागरिक आणि राजकीय निरीक्षकांच्या मते, ही निवड सावदा नगरपालिकेच्या विकास कामांसाठी आणि प्रशासकीय स्थिरतेसाठी एक महत्त्वाची दिलगिर ठरणार आहे. येत्या काळात नवीन प्रशासन शहराच्या मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते विकास, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांवर विशेष भर देईल, अशी नागरिकांमध्ये अपेक्षा निर्माण झाली आहे.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
| व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा : क्रीष्णाज मेकअप स्टुडीओ |
![]() |
| विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा |
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.











إرسال تعليق