Khandesh Darpan 24x7

निंभोरा महिला अधिकारी यांच्या कार्याचे ग्रामस्थांकडून स्वागत



प्रतिनिधी | निंभोरा 



निंभोरा येथे महिला अधिकारी स.पो.नि. मीरा देशमुख हे चांगले कामकाज करीत असल्याने गावकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा यासाठी महिला अधिकारी काम करत आहेत. या उपक्रमांमुळे गावातील महिलांना आत्मनिर्भरता आणि सुरक्षा मिळत आहे.  



अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच शेतकऱ्यांचे शेती उपयोगी साहित्य व शेतमालाचे नुकसान करणारे व्यक्तींची हयगय केली जाणार नाही, असा कडक इशारा दिला आहे. या निर्णयाचे निंभोरा ग्रामस्थांकडून स्वागत आणि त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा यासाठी महिला अधिकारींचे काम महत्त्वपूर्ण आहे. असे विचार निंभोरा येथील प्रल्हाद बोंडे, कडू चौधरी, डीगंबर चौधरी, डॉ. सुधाकर चौधरी, अनिल बऱ्हाटे, श्रीमती प्रमिला खाचणे, यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. 







यावेळी नरेंद्र ढाके, राजीव बोरसे, वाल्मीक पवार, छबीलदास बऱ्हाटे, प्रमोद बोरोले, मनोहर वाणी, भालचंद्र कोळंबे, मनोहर तायडे, कल्पना चौधरी, नंदिनी पंत, संगीता राणे, वंदना राणे, लीना भारंबे, श्रीमती माधुरी गुजराती, मनीषा बोरोले, सरला बोरोले, सुशीला पाटील, पदम पाटील, पदमबाई वानखेडे, रेखा तायडे, लताबाई पाटील, नलूबाई सोनवणे, मीराबाई लहासे, भारती मोरे यासह आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या. 



प्रसंगी काही महिलांनी निंभोरा येथे अवैध पन्नी दारू बंद व्हावी यासाठी मीरा देशमुख यांना साकड घालून अनेक महिलांचे संसार या दारूमुळे उध्वस्त होत असून अनेक विवाहित महिला विधवा झाल्या आहेत. या बाबीचे गांभीर्य घेऊन अवैध दारू (पन्नी) मुक्त गाव करावे तसेच या दारूचा समूळ नायनाट करावा यासाठी मागणी करण्यात आली.




सर्वांचे सहकार्याने दारू मुक्त गाव होणार - स.पो.नि. मीरा देशमुख


निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध (पन्नी) दारू मुक्त करण्यासाठी सर्वांचे सहकार्य असल्यास हद्दीतील सर्वच गावे दारू मुक्त होतील.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा  : क्रीष्णाज मेकअप स्टुडीओ   


सहप्रायोजक आहे.  


  




विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post