प्रतिनिधी | निंभोरा
रावेर तालुक्यातील गोलवाडे येथील तापीनदी बॅकवॉटर परिसरात अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू निर्मिती करून विक्री होत असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती निंभोरा पोलिस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांना मिळाली.
सदर माहितीच्या आधारे निंभोरा पोलिसांनी दि. 9 जानेवारी 2026 सदर ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी अवैध रित्या गावठी हातभट्टीची दारू गाळतांना संबंधित इसम नामे संजय विश्वनाथ तायडे वय 52 वर्षे रा. गोलवाडा ता. रावेर मिळून आला.
सदर ठिकाणी सुमारे 300 लिटर कच्चे रसायन तसेच 30 लिटर गावठी दारू व तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे तथा दारू गाळण्याचे असे अंदाजे 36000 रुपये किमतीचे साहित्य मिळून आले. सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून सदरील गावठी दारू निर्मिती हातभट्टी फोडून पूर्णतः नष्ट करण्यात आली असून सदर इसमाविरुध्द निंभोरा पोलिस स्टेशनला पो. काॅ. परेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
तसेच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये व फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई निंभोरा पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पो. ह. सुरेश अढायगे, पो. काॅ. महेंद्र महाजन, पो. काॅ. परेश सोनवणे या पथकाने केली आहे.
हातभट्टी गावठी दारू मुळे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारच्या गैरकृत्यांविरुध्द पोलिस प्रशासनाकडून यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
![]() |
| विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा |
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.




















Post a Comment