प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
श्री स्वामिनारायण मंदिर सावदा येथे भक्तिभावपूर्ण वातावरणात उद्या १४ फेब्रुवारी दिव्य भव्य अश्या शाकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सावदा निवासी हरिकृष्ण महाराज राधा कृष्णदेव यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य शास्त्री स्वामी धर्मप्रसाददासजी यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्री स्वामी भक्तीप्रकाशदासजी यांच्या नेतृत्वात मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी, तसेच शास्त्री स्वामी धर्मकिशोर दासजी, शास्त्री स्वामी अनंतप्रकाशदासजी, शास्त्री स्वामी सत्यप्रकाशदासजी यांनी आयोजित केला आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात आध्यात्मिक उत्साहाची लहर निर्माण झाली असून हरिभक्त व विविध क्षेत्रातील नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
शकोत्सव (शाकोत्सव) हा प्रामुख्याने स्वामीनारायण संप्रदायात हिवाळ्यात साजरा केला जाणारा एक विशेष उत्सव आहे, ज्यामध्ये भगवान स्वामीनारायण यांना वांग्याचे (भरीत) आणि विविध भाज्यांचे नैवेद्य अर्पण केले जाते. हा उत्सव सेवा, भक्ती आणि भोजनाचा संगम असून, यामध्ये हजारो भाविक एकत्र येऊन महाप्रसादाचा (विशेषतः वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, तूप आणि गुळ) आनंद घेतात.
शकोत्सवाची वैशिष्ट्ये:
ऐतिहासिक महत्त्व: भगवान स्वामीनारायण यांनी स्वतः लोया धाममध्ये संतांना वांग्याचे भरीत बनवून खिलावले होते, तिथून या उत्सवाची सुरुवात झाली.
प्रसाद: वांग्यासोबतच बटाटा, रताळे, सुरण यांसारख्या ३९ प्रकारच्या भाज्यांचा वापर करून हा खास नैवेद्य तयार केला जातो.
उत्साह: हिवाळ्यातील थंड हवेत, उघड्यावर (निसर्गाच्या सानिध्यात) तूप आणि मसाल्यांचा वापर करून तयार केलेले वांग्याचे भरीत आणि गरम भाकरी हा या उत्सवाचा मुख्य गाभा आहे.
ठिकाण: हा उत्सव स्वामीनारायण संप्रदायाच्या वडताल, नाशिक, साळंगपूर (हनुमानजी मंदिर) व इतर अनेक केंद्रांवर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
हा सण भक्तीभावासोबतच समाजसहभोजनाचे (सामूहिक भोजनाचे) उत्तम उदाहरण आहे, जिथे सण आणि परंपरांचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो.
हि बातमी आपण वाचत आहात यांचे सौजन्याने ![]()
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० वाजता कथामृत व सत्संगाने होणार असून कथा सत्र सकाळी १०.३० वाजेपर्यंत चालणार आहे. शाकोत्सवाच्या कथेसाठी स.गु. शास्त्री स्वामी भक्तीप्रकाशदास उपस्थित राहणार आहे. त्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादामध्ये लहान पूर्ण वांग्याची लाल भाजी व बाजरीची भाकर असा पारंपरिक व विशेष मेनू ठेवण्यात आला असून स्वामिनारायण भगवंतांच्या आशीर्वादाने हा प्रसाद दरवर्षी भक्तांना वितरित केला जातो.
या प्रसंगी संतांच्या पवित्र सान्निध्यात धार्मिक विधी, सत्संग व सामूहिक भक्तीभावाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. समाजातील सर्व स्तरांतील भाविकांनी उपस्थित राहून या शाकोत्सावाच्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदास यानी केले आले आहे.
सावदा परिसरातील धार्मिक परंपरा, सामाजिक एकात्मता आणि सामूहिक सेवाभाव वृद्धिंगत करणारा हा सोहळा ठरणार असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
| व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा |
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |




















Post a Comment