Khandesh Darpan 24x7

जळगावातील बड्या पदाधिकाऱ्याचा विधवेवर बलात्कार : एकनाथ खडसे यांच्या आरोपाने खळबळ

जळगावातील बड्या पदाधिकाऱ्याचा विधवेवर बलात्कार : एकनाथ खडसे यांच्या आरोपाने खळबळ; पोलिसांवर आरोपीला अभय दिल्याचा ठपका




खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -


हि बातमी आपण वाचत आहात यांचे सौजन्याने 





सत्ताधारी पक्षाच्या जळगावमधील एका बड्या पदाधिकाऱ्याने विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसेंनी या प्रकरणी सदर बड्या नेत्याचे नाव घेतले नाही, पण पोलिसांवर त्याला पाठिशी घालण्याचा आरोप केला आहे. यामुळे हा बडा पदाधिकारी कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सावदा परिसरातील एका मोठ्या गावातील विधवा महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. हा बलात्कार एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केला आहे. पीडित महिला या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी सावदा पोलिस ठाण्यात गेली होती. ती तिथे दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत थांबली. पण त्यानंतरही तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. आरोपी मोठ्या पक्षाचा मोठा पदाधिकारी आहे. तर पीडित महिला विधवा आहे. तिची तक्रार दाखल करून न घेणे हा गंभीर गुन्हा आहे.



तब्बल 7 तास ताटकळत ठेवून गुन्हा नोंद नाही


संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाने पीडित महिलेची तक्रार दाखल करून न घेता उलटपक्षी तिलाच धमकावले. तिला बळजबरीने घरी पाठवून दिले. हा सर्व प्रकार पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मी त्या फुटेजची मागणी केली आहे. आम्हाला ते फुटेज अद्याप मिळाले नाही. पण ही माझी माहिती आहे. एका मोठ्या पदाधिकाऱ्याने विधवा महिलेवर बलात्कार करणे व पोलिसांनी त्याची दखल न घेणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. विशेषतः 7-7 तास पोलिस ठाण्यात ताटकळत उभे करूनही बलात्कार पीडितेला न्याय मिळत नसेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे खडसे म्हणाले.



पोलिस अधिकाऱ्यावर केले गंभीर आरोप


एकनाथ खडसे यांनी यावेळी सावदा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यांनी यासंबंधी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख करत एक फोटो पत्रकारांना दाखवला. त्याद्वारे त्यांनी पोलिस अधिकारी कशा प्रकारे मंत्र्यांसोबतचे फोटो आपल्या स्टेटसवर ठेवून त्यांना संरक्षण देतात हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. प्रस्तुत प्रकरणातील आरोपी पदाधिकाऱ्याला राजकीय संरक्षण मिळत असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मोठी हेराफेरी केली जात आहे. संबंधित पोलिस अधिकारी केवळ गुन्हेगारांना पाठिशी घालत नाही, तर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करत आहे, असे खडसे म्हणाले.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   






व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 






Post a Comment

أحدث أقدم