Khandesh Darpan 24x7

नवनिर्वाचित नगरसेविका सिमरन वानखेडे यांचा शहरात विविध सामाजिक कामांना प्रारंभ



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी




हि बातमी आपण वाचत आहात यांचे सौजन्याने 






सावदा येथील नगरपरिषदेत निवडून आलेल्या नव्या चेहऱ्यापैकी एक तसेच सामाजिक तथा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या माजी तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांच्या कन्या सिमरन वानखेडे यांनी सावदा शहरात आपली सामाजिक बांधिलकीची इनिंग प्रभावीपणे सुरु केली आहे. 



शहरातील नागरिकांमध्ये यामुळे आनंदाची लहर उपटत असल्याचे दिसून येत आहे. त्या शहरातील प्रभाग क्रमांक १ मधून निवडून आल्या असून प्रभागात तसेच शहरात फेरफटका मारत असताना नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांना प्रथम प्राधान्य देत सोडविण्याचा सफल प्रयत्न करताना दिसत आहे. 



त्यांनी शहरातील सर्व स्मशानभूमीना भेट देत स्वच्छता, विद्युत दिवे, पाण्याची व्यवस्था यांचा आढावा घेत मोहिमा राबवल्या. सावदा स्टेशन रोड तथा रावेर रोड वरील स्मशान भूमीत बेलाचे, लिंबाचे असे रुक्ष लागवड करून त्यांना नियमित पाणी देण्याचे काम करून पर्यावरण संवर्धन करत स्मशानभूमी परिसराला हरितरूप देण्याचा प्रयत्न त्याच बरोबर कचरा निर्मूलन, रस्ते, गटारी स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले आहे. 



त्याचप्रमाणे सावदा शहरातील रेशनधारक नागरिकांना रेशन धान्य न मिळणे, लाभार्थी यादीत नाव नसणे, आधार सीडिंग न होणे किंवा कमी प्रमाणात धान्य मिळणे अशा विविध तक्रारींच्या समस्यांमुळे रेशन धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या मार्गी लावण्यासाठी सिमरन वानखेडे यांनी विशेष मोहिम सुरू केली आहे. 



पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे यासाठी नागरिकांनी आपल्या रेशन कार्डची सत्यप्रत, रेशन कार्डवरील सर्व सदस्यांच्या आधार कार्डच्या सत्यप्रती तसेच संबंधित आवश्यक कागदपत्रांसह संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात सिमरन वानखेडे यांच्यासोबत माजी नगराध्यक्षा सुभद्राबाई बडगे या देखील नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेत आहेत. 



दि. २ मार्च २०२६ पर्यंत सर्व कागदपत्रे संकलित करून संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार असून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेक रेशनधारकांच्या अडचणी दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.“शहरातील एकही पात्र लाभार्थी रेशन धान्यापासून वंचित राहू नये, ही आमची ठाम भूमिका आहे. नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सिमरन वानखेडे यांनी सांगितले. 



या उपक्रमात महिला आघाडी आणि सर्व महिला नगरसेवकांचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले. नागरिकांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून रेशनसंबंधी प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकूणच, सावदा शहरातील रेशनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी राबविण्यात आलेला हा पुढाकार अनेकांसाठी दिलासादायक ठरण्याची चिन्हे असून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळवून देण्याचा प्रयत्न वेग घेत आहे.


या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   






व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post