प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
यंदाच्या श्री क्षेत्र कुंभारखेडा येथे आयोजित आदिशक्ती संत मुक्ताई फिरता नारळी सप्ताहाची यजमानपदसेवा यावल व रावेर तालुक्याला मिळाले आहे. या महोत्सवाचे नियोजन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज आणि रवींद्र हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यानिमित्त आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आदिशक्ती मुक्ताबाई पादुका पालखीचे सावदा शहरात आगमन झाले.
हि बातमी आपण वाचत आहात यांचे सौजन्याने ![]()
विठ्ठल नामाच्या तसेच तसेच टाळ, मृदंग, झांज्याच्या मंगल ध्वनीत जुना स्टेशन नाका, विठ्ठल मंदिर, धर्मवीर संभाजी चौक, इंदिरा गांधी चौक, स्वामीनारायण मंदिर, सोमवारगिरी मढी या मार्गे पुढे फैजपूर कडे मुक्ताई पादुका पालखीचे मार्गक्रमण झाले.
सावदा शहरात पालखीचे मोठ्या भक्तिमय वातावरणात शहराच्या नगराध्यक्षा रेणुका पाटील यांनी स्वागत केले. स्वागता वेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, सावदा पोलिस स्टेशनचे सपोनी विशाल पाटील आदी उपस्थित होते.
नागरिकांनी पादुका पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढून मार्ग सुशोभित करून मार्गावर समृद्धी, चैतन्य आणि मांगल्याचे प्रतीक मानली जाणारी अशी गुढी उभारून तसेच पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले. पालखी मार्गावर पालखीत सहभागी असणाऱ्या सर्व भाविकांना पाणी, चहा, बिस्कीट तसेच थंड पेय ची व्यवस्था करण्यात आली होती.
पालखी स्वामिनारायण मंदिराजवळ आल्यानंतर मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी, शास्त्री स्वामी भक्तीप्रियदासजी, शास्त्री स्वामी विश्वप्रकाशदासजी, शास्त्री स्वामी अनंतप्रकाशदासजी, भंडारी स्वामी माधवप्रियदासजी यांनी पादुकांचे स्वागत तथा पूजन केले.
पालखी संध्याकाळी साधारण ७ वाजेला फैजपूर, न्हावी, कळमोडा, खिरोदा, सावखेडा, रोझोदा, चिनावल यामार्गे श्री क्षेत्र कुंभारखेडा येथे पोहोचणार आहे.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |


















Post a Comment