Khandesh Darpan 24x7

होळीच्या रंगात रंगले पौर्णिमा दर्शन; सावदा येथील श्री स्वामिनारायण मंदिरात भाविकांची उत्स्फूर्त गर्दी




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी





वडताल धाम अंतर्गत सावदा येथील पुरातन श्री स्वामिनारायण मंदिरात २ मार्च रोजी पौर्णिमेनिमित्त विशेष दर्शन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर ३ मार्च ऐवजी हा सोहळा आदल्या दिवशीच आयोजित करण्यात आला होता. पौर्णिमा निमित्त सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, आरती, भजन-कीर्तन आयोजित करण्यात आले. 


हि बातमी आपण वाचत आहात यांचे सौजन्याने 





दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सावदा शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. यंदाच्या पौर्णिमा दर्शन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे होळी सणानिमित्त येथील विराजमान श्री राधाकृष्ण देव, हरिकृष्ण महाराज यांच्या मुर्त्यांची करण्यात आलेली आकर्षक सजावट. मूर्तींना साखरेपासून तयार केलेल्या होळीच्या अलंकारांनी तसेच नैसर्गिक रंग, पिचकारी इ. ने केलेली सजावट. ही अनोखी आणि देखणी सजावट मंदिराचे पुजारी स्वामी सत्यप्रकाशदासजी यांनी भावपूर्ण सेवाभावाने साकारली. सजावटीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 




या निमित्त बाहेरगाव हून आलेल्या भाविकांना फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. येत्या ४ मार्च २०२६ रोजी नरनारायण देव जयंतीनिमित्त मंदिरात पारंपरिक पद्धतीने “फुलडोल उत्सव” साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मंदिरात सुगंधी फुलांची आरास, विशेष सजावट, भजन-कीर्तन व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात भगवान नरनारायण देवांना विविधरंगी फुलांनी सजवून फुलडोल उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 




या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी, शास्त्री स्वामीधर्मकिशोरदासजी, पुजारी स्वामी सत्यप्रकाशदासजी तसेच व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व हरिभक्तांना करण्यात आले आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   






व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post