Khandesh Darpan 24x7

सावदा येथे होळीचा सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा





प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी





शहरात चौका चौकात होळीचा सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. परिसरातील रहिवाशांनी एकत्र येत परंपरेनुसार होळीच्या भोवती आकर्षक रांगोळ्या काढून आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अग्निदेवतेची पूजा करण्यात आली. 



हि बातमी आपण वाचत आहात यांचे सौजन्याने 





या पवित्र अग्नीमध्ये निराशा, आळस आणि दरिद्र्याची आहुती देऊन सर्वांनी सुख, शांती आणि निरामय आरोग्यासाठी मंगल कामना केली. शहरातील सोमवारगिरी मढी परिसरात वीस वर्षापासून जोपासली जाणारी होळी पूजनाची परंपरा यावर्षी मोठ्या उत्साहात पार पडली. 





सोमवारगिरी मढी येथील साधवी सारिका माताजी यांचे हस्ते तथा परिसरातील रहिवाशांनी एकत्र येत परंपरेनुसार होलिकेचे पूजन केले आणि नैवेद्य अर्पण केला. "होळी हा सण केवळ रंगांची उधळण नसून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. आपली ही समृद्ध संस्कृती आपण जपली पाहिजे आणि ती पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवली पाहिजे. दृष्टप्रवृत्ती आणि अमंगल विचारांचा त्याग करून सात्त्विक विचार अंगी बाळगणे, हा या सणामागचा मुख्य उद्देश आहे. भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची पौराणिक कथा या उत्सवाशी प्रामुख्याने जोडलेली असून, त्यातूनच होलिका दहनाची परंपरा रूढ झाली." असे अध्यात्मिक वक्तव्य साधावी सारिका माताजी यांनी यावेळी व्यक्त केले.




या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   






व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post