Khandesh Darpan 24x7

नंदकिशोर महाजन (नंदू महाजन) यांना विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी सरपंच परिषदीपदी समर्थन



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची परंपरागत ताकद अधिक दृढ करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक पोकळी भरून काढण्यासाठी येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत नंद्कीशोर महाजन (नंदू महाजन) विधान परिषदेच्या पदासाठी उमेदवारी देण्यासाठी सरपंच परिषदेतून जोरदार मागणी केली जात आहे. 



महाजन यांच्या अनुभवावर भर देत त्यांना उमेदवारी देण्याची आवश्यकता व्यक्त केली. ही मागणी सरपंच परिषद, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, जळगाव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब धुमाळ आणि रावेर तालुका अध्यक्ष अमोल पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महाजन हे स्थानिक राजकारणात एक प्रसिद्ध नाव असून, त्यांच्या कारकिर्दीचा वाटा स्थानिक विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. परिषदेतर्फे झालेल्या चर्चेत सर्व सरपंचांनी एकमताने महाजन यांना पुढच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचे समर्थन केले.



निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मुक्ताईनगर हा मतदारसंघ अनेक वर्षांपासून भाजपाचा विश्वासार्ह गड राहिला असून येथील जनतेने सातत्याने पक्षाला पाठिंबा दिला आहे. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या धोरणानुसार हा मतदारसंघ सहयोगी पक्षाला दिल्यानंतर भाजपचा थेट आमदार नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सक्षम आणि अनुभवी नेतृत्वाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. 



नंदकिशोर महाजन यांचे पक्ष संघटन आणि निवडणूक व्यवस्थापनात केलेले कार्य अत्यंत प्रभावी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यामुळे पक्षाची उपस्थिति आणि जनसंपर्क सुधारण्यात मदत झाली आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. 



त्यांनी लोकसभा निवडणुकीत दोन वेळा नेतृत्त्व केले आणि यादरम्यान कार्यकर्त्यांशी सुसंगत संपर्क राखण्यावर भर दिला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकात्मता आणि उत्साह वाढला, जो निवडणुका जिंकण्यात महत्वाचा ठरला. तसेच विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यात मोलाचा वाटा उचलला शिवाय जळगाव जिल्हा दुध संघ निवडणुकीतही त्यांनी काटेकोर रणनीतीच्या आधारे प्रस्थापितांविरुद्ध यश मिळवले. 



नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रमुख म्हणून जबाबदारी निभावत जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांमध्ये पक्षाला यश मिळवून दिले. ग्राम पंचायत,पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत देखील महाजन यांनी पार पाडलेली भूमिका, तेथील सदस्याना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, दिलेली प्रेरणा यामुळे गाव खेड्यातील बहुसंख्य्क तरुण राजकारणाकडे सकारात्मक दृष्ट्या पाहू लागलेले असून तरुणाचा गाव खेड्यातील वाढता सहभाग देशाची होत असलेली प्रगती दर्शवतो. 



सरपंच परिषदेकडून करण्यात आलेल्या निवेदनात एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे तो म्हणजे महाजन यांचा जिल्ह्यातील सरपंचांशी असलेला घट्ट संपर्क जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांतील सरपंचांना त्यांनी विविध विकासकामांबाबत मार्गदर्शन केले असून, शासकीय योजना राबविताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेतात. गावपातळीवरील समस्या शासनापर्यंत पोहोचवणे, निधी मिळवून देणे आणि विकासकामांना गती देणे या बाबतीत त्यांची भूमिका अत्यंत प्रभावी राहिली आहे.



त्यामुळे जिल्ह्यातील सरपंचांमध्ये त्यांच्याविषयी विशेष विश्वास आणि आत्मीयता निर्माण झाली आहे. नंदकिशोर महाजन यांना विधान परिषद उमेदवारी दिल्यास मुक्ताईनगरसह संपूर्ण जिल्हा व परिसरात सरपंच व सदस्य याना आपला हक्काचा मार्गदर्शक मिळून अधिक वेगाने काम करण्यास प्रेरणा मिळेल तसेच गावगाड्याचा कारभार अधिक आणि गतिमान होईल, तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढेल, असा विश्वास सरपंच परिषद पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


खान्देश दर्पण २४x७  परिवाराच्या वतीने 


नंदू  महाजन यांना 




या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



               


व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 







Post a Comment

Previous Post Next Post