प्रतिनिधी | फैजपूर
मौलाना अबुल कलाम आझाद च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यालयात मुख्याध्यापक हाजी जाकीर सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यालय परिसरात उत्साह आणि भावनिक वातावरण पाहायला मिळाले.
हाजी जाकीर सर यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच नैतिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यांच्या कार्याचा ठसा विद्यार्थ्यांच्या मनावर कायम राहणार आहे.
प्रसंगी धनंजय चौधरी, करीम सालार सर जळगाव, फारुख शेख जळगाव, जमाते इस्लामी संघटने चे फैजपुर शहर अध्यक्ष अब्दुल रऊफ, माजी उपनगर अध्यक्ष फैजपुर कलीम खा मन्यार, नगरसेवक अनवर खाटीक, मेंबर आवेश भाजा, उपनगर अध्यक्ष शेख कुर्बान हाजी करीम, सावद्याचे अजगर सैय्यद, माजी उप नगराध्यक्ष पि. के. चौधरी, डॉक्टर जलील शेख, शेख अब्दुल्ला रसूल, मौलाना आझाद चे माजी मुख्यध्यापक आर. क्यू. शेख सर, वैद्य सर, वसीम जनाब, नासीर हुसेन शेख करीम, पत्रकार राजू तडवी, तडवी टायगर ग्रुप चे अध्यक्ष जमीर तडवी, पत्रकार सलीम पिंजारी, पत्रकार इदु पिंजारी, मौलाना आझाद शाळेचा पूर्ण स्टाप, मुन्सिपल हायस्कूलचे कर्मचारी शिक्षक शिक्षिका तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या हस्ते हाजी जाकीर सर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह, आणि मौलाना अबुल कलाम आझाद स्टाप कडून दु चाकी गाडी देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून जाकीर सर यांच्या कर्तव्यनिष्ठा, साधेपणा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक सादरीकरण करून आपल्या आवडत्या मुख्याध्यापकांना निरोप दिला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सरांच्या मार्गदर्शनामुळेच आपले भविष्य घडल्याचे सांगितले. प्रसंगी हाजी जाकीर सर यांनी सर्वांचे आभार मानत, “शिक्षण क्षेत्रात काम करणे ही माझ्यासाठी सेवा होती. विद्यार्थ्यांचे यश हेच माझे खरे समाधान आहे,” असे भावनिक शब्दांत सांगितले.
या सत्कार सोहळ्यामुळे विद्यालयात आनंद, कृतज्ञता आणि भावनांचा संगम पाहायला मिळाला. हाजी जाकीर सर यांच्या सेवानिवृत्तीने एक प्रेरणादायी अध्याय संपला असला तरी त्यांनी दिलेली शिकवण आणि संस्कार विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा देत राहतील.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे :
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |


















Post a Comment