प्रतिनिधी | थोरगव्हाण
थोरगव्हाण ता. रावेर येथील दी एज्यूकेशन सोसायटी, थोरगव्हाण स्थापना (१९१७) संचालित डी. एस. देशमुख विद्यालयात भारतीय बालकल्याण परिषद, दिल्ली तर्फे राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सुरुवातीला भारताचे माजी पंतप्रधान स्व. डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. शालेय परिपाठ वेळी विद्यार्थ्यांना त्यांचे जीवन कार्याची माहिती वाय. जे. कुरकुरे यांनी सांगितली.
या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यासाठी ही स्पर्धा मोफत होती. सामाजिक व पर्यावरणीय या विषयावर विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनशीलतेने सुंदर चित्र रेखाटले. ही स्पर्धा जिल्हा बालकल्याण समितीचे महेंद्र पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, शालेय समिती सदस्य मधुकर कोल्हे, संचालक नंदकुमार चौधरी, रविंद्र पाटील (मनुर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रसंगी "विद्यार्थ्यांना खडू, फळा या चार भिंतीच्या बाहेरील जगात घेवुन जाण्याचा तसेच त्यांचे कडील स्तुप्त गुणांना प्रकट करण्यासाठी व भावी चित्रकार निर्माण करण्यासाठी असे प्रबोधन कार्यक्रम बालकल्याण समिती करते. तसेच उत्कृष्ठ चित्रास पारितोषिक तथा शिष्यवृती दिली जाते. बालकांनी केलेल्या अलौकीक प्राणरक्षक कार्यासाठी महामहीम राष्ट्रपती यांचे शुभ हस्ते विशेष शौर्य पुरस्कार दिला जातो." असे उद्गार महेंद्र पाटील यांनी प्रकट केले.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी सहभागी विद्यार्थ्यांना चित्र काढणासाठी ड्रॉइंगशिट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देणाऱ्या कार्यकमाचे आयोजन करण्यासाठीचे अभिनंदन व कौतुक केले. बालकल्याण समितीच्या शिफारशीने आपल्या जिल्ह्यात समितीने चार शौर्य पुरस्कार महामहीम राष्ट्रपती यांचे शुभहस्ते प्रदान केले आहे असे स्पष्ट केले.
परीक्षेचे नियोजन कला शिक्षक एस. बी. सपकाळे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. बी. सपकाळे यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे माजी संचालक प्रविण पाटील, पालक संघाचे उपाध्यक्ष संतोष राणे यांनी भेट दिली. उपक्रमाचे कौतुक केले. समारोप प्रसंगी माजी संचालक प्रविण पाटील, मुख्याधापक सत्यनारायण वैष्णव यांनी मनोगत व्यक्त केले. बालकल्याण समितीने ही चित्रकला स्पर्धा विद्यालयात आयोजित केल्या साठी धन्यवाद दिले. संस्थेचे सचिव पवन चौधरी, सहसचिव रामराव देशमुख सर्वसन्मानिय संचालक बंधुभगिनी यांनी या चित्रकला स्पर्धा आयोजनाचे स्वागत केले आहे.
चित्रकला स्पर्धा यशस्वीतेसाठी कला शिक्षक एस. बी. सपकाळे, वाय. जे. कुरकुरे यांचे सह सर्व शिक्षक बंधुभगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी सहकार्य केले. कार्यप्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन कलाशिक्षक एस. बी. सपकाळे यांनी तर आभार वाय. जे. कुरकुरे यांनी सादर केले.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
















إرسال تعليق