तांदलवाडी येथे मोबाईल बॉक्स मध्ये मिळाले साबण
प्रतिनिधी | बलवाडी
येथील रहिवासी सुनील दशरथ पाटील यांनी त्यांच्या मित्रा मार्फत एक ऑनलाइन अँप वरून प्रख्यात कंपनीचा रु. १२,५०० किमतीचा मोबाईल ऑफर असल्याने दि.२० डिसेंबर रोजी बुक केला होता. दि.२२ डिसेंबर रोजी त्यांना त्याची डिलिव्हरी मिळाली. डिलिव्हरी देते वेळेस पाटील स्वतः घरी नसल्याने त्यांच्या मुलीने तो मोबाइल घेऊन मोबाईल ची रक्कम डिलिव्हरी बॉय कडे जमा केली व वडिलांना फोन लावत ओटीपी मागीतला तो दिल्यानंतर डिलिव्हरी बॉय निघून गेला.
नंतर मोबाईल बॉक्स उघडताच त्यांना धक्काच बसला मोबाईल बॉक्स दिसायला सर्वसामान्य दिसत होता पण आत डेटॉल कंपनीचे तीन व संतूर कंपनीचे दोन असे पाच आंघोळीचे साबण निघाले. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी कस्टमर केअर ला बऱ्याच वेळा फोन केला पण ते समाधान कारक उत्तर देत नाही असे आढळले.
डिलिव्हरी बॉय ला फोन लावला तर तो म्हणतो मी नवीन आहे माझ्या बाबतीत ही पहिलीच घटना असल्याने तोही हतबल दिसून आला. तेव्हा आता काय करायचे कळत नाही. एक सर्वसाधारण घरातील व्यक्तीसाठी ही रक्कम बरीच मोठी असते एवढ्या किमतीचा मोबाईल फोन घेण्यासाठी कोणालाही बरीच काटकसर व बचत करावी लागते पण ज्यावेळी अशी घटना घडते तेव्हा त्या व्यक्तीची काय परिस्थिती असते ते त्यालाच ठाऊक असते. बऱ्याच वेळेस कंपनीचा दोष नसतो तर डिलिव्हरी देणारे हे कारस्थान करीत असतात तेव्हा नागरिकांनी सतर्क राहूनच ऑनलाइन खरेदी करावी अशी सर्वत्र चर्चा होत आहे.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.














إرسال تعليق