Khandesh Darpan 24x7

कु. तन्वी नेमाडे ची इंडियन ऑयडल कडे भरारी




प्रतिनिधी :  सारिका चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी





सावदा येथील श्री स्वामिनारायण गुरुकुल संस्था संचलित श्री स्वामिनारायण माध्यमिक विद्यालय, ची इयत्ता ९ वी सेमी मधील विद्यार्थिनी तन्वी मोहन नेमाडे हिची सोनी टी व्ही या मनोरंजन वाहिनी वरील Indian Idol या कार्यक्रमाच्या सीजन १६ च्या Ground Audition साठी निवड झालेली आहे. 



शाळेत होणाऱ्या गायन, भजन, देशभक्तीपर गीत, कथाकथन अशा विविध स्पर्धांमध्ये ती स्वयंस्फूर्तीने सहभागी  झाल्यामुळे तिच्यात असलेल्या कलागुणांना वाव मिळाला व तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. शाळेतून मिळालेल्या व्यासपीठाचा तिने योग्य पद्धती ने वापर केला.



तन्वी नेमाडे या विद्यार्थिनीच्या पालकांची आर्थिक परिस्थिती जेम तेम असल्याने तन्वी ने कोणत्याही प्रकारचा संगीताचा क्लास न करता केवळ शाळेतून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे तसेच विद्यालयातील संगीत शिक्षक निलेश बोरोले यांनी तिच्यातील हा कलागुण ओळखून तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले. हे सर्व करत असताना तिने संगीताचे स्वयं अध्ययन व सराव करून हे विशेष प्राविण्य मिळविले. 



तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प.पू.स.गु.शास्त्री श्री भक्तिप्रकाशदासजी, उपाध्यक्ष प.पू.स.गु.शास्त्री श्री. अनंतप्रकाशदासजी, संचालक पी.डी.पाटील,  प्राचार्य संजय वाघुळदे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे कौतुक केले व तिच्या पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा व आशिर्वाद दिले.




या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 





Post a Comment

أحدث أقدم