साकळी येथे दहा वर्षाच्या लेकीने मृत पित्याला दिला अग्नीडाग !
बालिकादिनीच बालिकेच्या हातून घडले भावनिक 'कर्तव्य'
सर्व नात्यांमध्ये बाप-लेकीचे नाते भावनिकदृष्ट्या किती घट्ट व मजबूत असते याचा प्रत्यय साकळी येथील एका दुःखदायक घटनेवरून दिसून आला. ज्या बापाने जन्मापासूनच आपल्या लेकीवर मनापासून खूप प्रेम केले त्या आपल्या मृत पित्याला अवघ्या दहा वर्षाच्या लेकीने खांदा देत अग्नीडागही दिला आणि मुलाप्रमाणेच या मुलीने आपले ' कर्तव्य ' पार पाडले.
मुळात आज दि.३ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून सर्वत्र साजरा होत असतांना त्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडली. तेव्हा या दिवशी बालिकेचे गोड कौतुक व्हायला पाहिजे होते त्या दिवशीच या छोट्याशा बालिकेच्या हातून घडलेल्या आपल्या पित्याप्रतीच्या बजावलेल्या कर्तव्याने सारे समाजमन हेलावले आहे.
साकळी येथील महाजन वाडा भागातील रहिवाशी असलेल्या किरण बापू माळी (वय ३५) या उच्चशिक्षित युवकाची अल्पशा आजाराने दि.३ रोजी भल्या पहाटे तीन वाजे दरम्यान जळगाव येथील सिव्हिल रुग्णालयात प्राणज्योत मलावली. या घटनेचे वृत्त किरण माळी यांच्या राहत्या गावी साकळी येथे कळाले असता त्यांच्या नातेवाईकांचा मन हेलाणारा एकच आक्रोश झाला. संपूर्ण माळी महाजन परिवार दुःख सागरात बुडाले.
दरम्यान याच दिवशी दुपारी १२ वाजता मृत किरण माळी यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत किरण माळी यांना कु. निधी ही एकुलती एक मुलगी आहे. दरम्यान अंत्यविधीच्या वेळी इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असलेल्या कु. निधी (वय-१०) हिने आपल्या मृत पित्याला खांदा दिला व स्मशानात चितेला अग्निडागही दिला. हा मन विचलित करणारा दुःखदायक प्रसंगाने उपस्थितांमधील अनेकांचे डोळे पाणावले.
स्व. किरण माळी हे उच्चशिक्षित होते. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू व सर्वांशी जमवून घेणारा होता. गावात त्यांनी काही काळ पत्रकारितेचे सामाजिक कार्यही केले होते. स्व. किरण माळी यांच्यावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीज्योत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता. ते त्यांना आपले आदर्श मानत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी, आई, वडील, भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.














إرسال تعليق