Khandesh Darpan 24x7

पाल कृषी विज्ञान केंद्रास डॉ. शरद गडाख यांची सदिच्छा भेट.

पाल येथील कृषी विज्ञान केंद्रास डॉ. शरद गडाख (कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) यांची सदिच्छा भेट.




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



दि. ४ जानेवारी 2025 रोजी कृषी विज्ञान केंद्र, पाल मार्फत आयोजित आदिवासी उपयोजना वर्ष 2024-25 अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण व निविष्ठा वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.



याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करून अधिक उत्पादन घेण्यासाठी नियोजन करावे तसेच कृषी तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रगती साधावी असे सूतोवाच केले. प्रसंगी आदिवासी शेतकऱ्यांना सातपुडा जातीचे कोंबडी पिल्ले वाटप करून त्यासोबत कोंबडी खाद्य वितरीत करण्यात आले. 



परिसरातील गारखेडा येथील १०० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. महेश महाजन (प्र. वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) यांनी सादर करताना केव्हिके राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली तर सूत्र संचालन डॉ. धीरज नेहेते यांनी केले व आभार प्रा. अतुल पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी कमिल तडवी (पाल) व गारखेडा येथील महिला शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 





Post a Comment

أحدث أقدم