प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा स्टेशन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी कारण्यात आली. कार्यक्रम समयी मोठया संख्येने नागरिक तथा जेष्ठ उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांनी मोठया प्रमाणात आयोजित कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
उपस्थितांपैकी शालेय विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. प्रसंगी धीरज झाल्टे यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाईंनी शिक्षणाचा पाया कश्या पद्धतीने रचला, त्याकाळी महिलांना शिक्षण घेण्यास सक्त मनाई होती. महिलांना फक्त चूल आणि मुल हीच रूढी चालू होती, ही रूढी बंद करण्याचे काम सावित्रीबाईंनी अपार परिश्रम, कष्ट सहन करून बंद केली. भारतील पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सावित्रीबाई होत्या. त्यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरु केली. असे उपस्थितांसमोर व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदयारत्न तायडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विक्रांत मोहसे, प्रशांत तायडे, आकाश तायडे, उमेश मोरे यांनी परिश्रम घेतले.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.














إرسال تعليق